सीताने चौदा वर्षे रामासोबत वनवास भोगला इथे राम चौदा दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने… इंदूरीकरांचे पुन्हा वादग्रस्त विधान

0

नाशिक जिल्ह्यात घोटी या ठिकाणी गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त घोटी कृषी उत्पन बाजार समितीत इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. इंदुरीकर महाराजांनी (indurikar Maharaj) कोरोणाची लस मी घेतली नाही, आणि घेणारही नाही. असं विधान केल्यामुळे ते आता अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महा विकास आघाडीचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच इंदुरीकर महाराजांनी केलेले हे विधान आता चर्चेत असून यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या निलेश घेतली नाही आणि घेणारही नाही या वाक्याचा राजेश टोपे यांनी समाचार घेत मी इंदुरीकर महाराज यांना महत्त्व पटवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदुरीकर महाराज आणि माझे चांगले संबंध आहेत. ते समाजाचे उत्तम प्रबोधन करतात, ते माझं नक्की ऐकतील असंही राजेश टोपे म्हणाले.

या कार्यक्रमात काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज

गोपाळरावजी गुळवे jgopalraoji gurave)  यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त घोटी कृषी उत्पन बाजार समितीत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी काही वादग्रस्त विधानं केली. तिरुपती दर्शन शक्ती वेगळी असते मी कुठेही फिरतो, मी लस घेतली नाही, आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर लस घेउन करायचं काय असंही ते म्हणाले. श्रीराम यांनी 14 वर्षे वनवास केला, मात्र त्यांनी सोबत सीतेला घेऊन वनवास केला. आपल्याकडे राम 14 दिवस कॉरंटाईन असला तर त्याच्याकडे सीता डोकूनही पाहत नाही.

इंदुरीकर महाराज आणि पुन्हा एकदा हे वादग्रस्त विधान केल्यामुळे ते आता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील इंदुरीकर महाराजांनी महिलांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. कार्यक्रमात इंदुरीकराच म्हणाले होते स्त्रियांसोबत जर सम तारखेला ‘संग’ तर मुलगा होतो आणि विषम तारखेला संघ केला तर मुलगी होते असं वादग्रस्त विधान केले होते. अमोशा आणि पौर्णिमेला संग केला तर बेवडी जात जन्माला येत असे देखील ते म्हणाले होते.

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक तंत्र कायदा, 1994 अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संगमनेरचे आरोग्य अधिकारी भास्कर भवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदुरीकर महाराज यांच्यावरची ही केस सध्या कोर्टात असून, त्यावर सुनावणी देखील सुरू आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.