राष्ट्रवादीची दिवाळी ‘ईडी’ने केली कडू;अनिल देशमुखांना मध्यरात्री केली अटक

0

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर असणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना काल रात्री उशिरा ED ने अटक केल्याची माहिती मिळते. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल चार समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून ते गायब होते. मात्र काल अचानक त्यानी ED ऑफिसला हजेरी लावली. ED च्या अधिकाऱ्यांनी तेरा तास चौकशी केल्यानंतर, ही कारवाई केल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आम्हाला १०० कोटी दर महिन्याला वसुली हप्ता गोळा करण्याचा आदेश दिल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला होता. विरोधकांनी या प्रकरणात राज्य सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून आले होते. सर्वत्र टीका झाल्यानंतर या प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा देखील द्यावा लागला होता.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. अंमलबजावणी संचन्यायालयाने तब्बल चार समन्स पाठवून देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नाही. विविध कारणे देत त्यांनी ही चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र काल स्वतःहून ते अंमलबजावणी संचन्यायालयाच्या ऑफिसला हजर राहिले. या कार्यालयातून त्यांनी एक व्हिडीओ देखील काल आपल्या ट्विटरवर शेअर केला होता.

अनिल देशमुख यांनी या प्रकरणात माझी याचिका कोर्टात आहे, त्याची सुनावणी सुरू आहे. तरी देखील आज मी स्वतःहून ऑफिसला चौकशीसाठी हजर झालो आहे. माझ्यावर आरोप करणारे, परमवीर सिंग आज कुठे आहेत? देश सोडून पळून गेले असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत असेही ते या व्हिडिओत म्हणत आहेत. ED ऑफिसला स्वतःहून हजर राहिल्यानंतर अनिल देशमुख यांची ED च्या अधिकाऱ्यांनी तब्बल 13 तास चौकशी केली, आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली.

 

अनिल देशमुख यांनी दर महिन्याला शंभर कोटी हप्ता गोळा करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या असल्याचा, आरोप करणारे परमवीर सिंग यांच्यावर देखील ED ने गुन्हा दाखल केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी परमवीर सिंग हे बेल्जियमला गेल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून आली होती. चौकशी सुरू असताना गुन्हा दाखल झालेला असताना, परमवीर सिंग बेल्जियमला गेले कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात असून या प्रकरणात शंका उपस्थित केली जात आहे.

अनिल देशमुख यांना आणि अंमलबजावणी संचन्यायालयाने अटक केली असल्यामुळे, राष्ट्रवादीसाठी आणि अनिल देशमुख यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय.

हेही वाचा- Video: माझ्या मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलादेखील घेतलं असतं, मी प्रत्येक नदी फिरले: अमृता फडणवीस 

ड्रग्स प्रकरणात फडणवीसांचं नाव आल्याने,राष्ट्रवादीने दिलं आव्हान; आम्ही तयार आहोत,नवाब मलिकही कडाडले 

रिषभ सजदेवा,काशिफ खान,अमिर फर्निचरवाला,प्रतिक गाभा,या ड्रग्स माफिया सोबत फडणवीसांचे संबंध; ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय 

T20 World Cup 2021:तीन तिघाड काम बिघाड! हीआहेत पराभवची कारणे,भारत साखळीतच गारद! टी-ट्वेन्टी नंतर वनडेचही जाणार कर्णधारपद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.