रिषभ सजदेवा,काशिफ खान,अमिर फर्निचरवाला,प्रतिक गाभा,या ड्रग्स माफिया सोबत फडणवीसांचे संबंध; ड्रग्ज प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय

0

नवाब मलिक आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे करत असून, या प्रकरणात भाजपचं मोठं कनेक्शन असल्याचे ते वारंवार सांगण्याचा प्रयत्नही करत आहेत. काल त्यांनी एका पत्रकार परिषदेत माझ्यावर चौकशी करा म्हणून सांगणारा माणूस, ‘निरज गुंडे’ हा चोर आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि निरज गुंडे यांचे कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला होता. एवढेच नाही तर तो कोणाच्या तरी सांगण्यावरून समीर वानखेडे यांना सातत्याने भेटत आहे. नवाब मलिक यांच्या सांगण्याचा निशाणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. मात्र त्यांनी फडणवीस यांचं नाव घेणं टाळले.

आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ड्रग्स प्रकरणात अटक असणारा ‘जयदीप चंदूलाल राणा’ यांचा फोटो शेअर केला आहे. राजकीय विश्लेषक ‘निशांत वर्मा’ यांच्या म्हणण्यानुसार जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर असून, त्याला एनसीबीने जून २०२१ मध्ये अटक केली आहे. जयदीप राणा यांचा अमृता फडणवीस यांच्या सोबतचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विटरवर पोस्ट केला असल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

नुकत्यात झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांवर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स प्रकरणात अटकेत असणारा, ड्रग्स माफिया जयदीप राणा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध आहे? ड्रग्स माफिया असणाऱ्या अनेक लोकांशी देवेंद्र फडणवीस का संबंध ठेवून होते? बीजेपी चे संबंधित असणाऱ्या माफियांना का सोडण्यात आलं? अशा अनेक गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी केले आहेत. एवढंच नाहीतर, या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माईंड आता देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय आमच्या डोक्यात येऊ लागला आहे.

या पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकावर टिच्चून मुंबई आणि गोव्यात ड्रग्स व्यवहार होत होता. एवढेच नाही तर समिर वानखेडे यांची बदली होण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा खूप मोठा हात असल्याचं देखील नवाब मलिक म्हणाले. रिषभ सजदेवा, काशिफ खान, अमिर फर्निचरवाला प्रतिक गाभा, हे मोठे ड्रग्स माफिया सोबत देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आम्हाला या प्रकरणाचा मास्टर माहिती देवेंद्र फडणीस असल्याचा संशय येतोय. असा गंभीर आरोप मलिक यांनी देवेंद्र फडणीस यांच्यावर केला आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुंबई नवी, पुण्याला जात असताना संध्याकाळी नीरज गुंडे या ड्रग्सशी संबंध असणाऱ्या माणसाला त्याच्या घरी, ते तासनतास चर्चा करत असायचे. निरज गुंडेला मुख्यमंत्री कार्यालयात एक्सेस होता. एवढेच नाही तर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निरज गुंडेच ठरवत होता. देवेंद्र फडणवीस त्याच्या घरून सगळ्या मायाजाल करत असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

सरकार बदलल्यानंतर आता हाच ‘नीरज गुंडे’ समीर वानखेडे यांच्या कार्यालयात चकरा मारत आहे. समीर वानखेडे यांना नीरज गुंडे गुपचुप का भेटत आहे? तो कोणाच्या सांगण्यावरून हे काम करत आहे? माझा संशय आहे, निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत असल्याचा संशय यायला लागला आहे,असा घणाघात नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

रिषभ सजदेवा, काशिफ खान, अमिर फर्निचरवाला प्रतिक गाभा, या ड्रग्स माफिया सोबत फडणवीस यांचे असणारे संबंध, यावरून आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचा मास्टर माईंड ‘देवेंद्र फडणवीस’ असल्याचा संशय यायला लागला आहे. असाही घणाघात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मलिक यांनी केलेल्या या गंभीर आरोपावर आता भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणीस काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा-मोठी बातमी! महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही सर्वाधिक

आर्यन खान ड्रग्स प्रकरण: ड्रग्स माफिया जयदीप राणा; आणि अमृता फडणवीस यांचा फोटो व्हायरल; नवाब मलिक यांनी उघड केला संबंध

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड

T20 World Cup 2021:तीन तिघाड काम बिघाड!  आहेत पराभवची कारणे,भारत साखळीतच गारद! टी-ट्वेन्टी नंतर वनडेचही जाणार कर्णधारपद

मोठी बातमी! जात प्रमाणपत्रारावरून समीर वानखेडेच्या अडचणीत होणार वाढ, धनंजय मुंडे म्हणाले..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.