ड्रग्स प्रकरणात फडणवीसांचं नाव आल्याने,राष्ट्रवादीने दिलं ‘हे’ आव्हान; आम्ही तयार आहोत,नवाब मलिकही कडाडले

0

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत होते. ही केस फर्जीवाडा असून याचा तपास करणारा माणूसही फेक असल्याचे गंभीर आरोप त्यांनी समीर वानखेडेंवर केले. मात्र आता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून,या प्रकरणाचा मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय येत असल्याचं त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ड्रग्स प्रकरणात अटक असणारा ‘जयदीप चंदूलाल राणा’ यांचा फोटो शेअर केला आहे. जयदीप चंदुलाल यांच्यासोबत या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील आहेत. राजकीय विश्लेषक ‘निशांत वर्मा’ यांच्या म्हणण्यानुसार जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर असून, त्याला एनसीबीने जून २०२१ मध्ये अटक केली आहे. जयदीप राणा यांचा अमृता फडणवीस यांच्या सोबतचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विटरवर पोस्ट केला असल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.

नुकत्यात झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांवर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स प्रकरणात अटकेत असणारा, ड्रग्स माफिया जयदीप राणा यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचा काय संबंध आहे? ड्रग्स माफिया असणाऱ्या अनेक लोकांशी देवेंद्र फडणवीस का संबंध ठेवून होते? बीजेपी चे संबंधित असणाऱ्या माफियांना का सोडण्यात आलं? अशा अनेक गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी केले आहेत.

रिषभ सजदेवा,काशिफ खान,अमिर फर्निचरवाला,प्रतिक गाभा,या ड्रग्स माफिया सोबत फडणवीसांचे असणारे संबंध मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. ड्रग्स माफिया बरोबर देवेंद्र फडणवीस यांचे असणारे घनिष्ठ संबंध, कुठेतरी या प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय आज आमच्या डोक्यात येऊ लागला असल्याचा घणाघात आणि गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषद संपल्यानंतर नवाब मलिक यांनी लगेच आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केलं आहे. नवाब मलिक यांनी एका ओळीचं ट्विट केलं असून यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी चॅलेंज केल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांनी हे ट्वीट हिंदीमध्ये केलं आहे. “है तैयार हम” असं एका ओळीचं ‘ट्विट’ त्यांनी केलं असून, देवेंद्र फडणवीसांना मेंशन केलेलं आहे.

सकाळपासून नवाब मलिक देवेंद्र फडणवीस यांच्यावर करत असलेले गंभीर आरोप, आणि देत असलेले चॅलेंज आता देवेंद्र फडणवीस स्वीकारतायत का? देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणावर आपली भूमिका कधी मांडणार? आणि काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आता राहिलेले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात नेमकं गौडबंगाल काय आहे? याची देखील उत्सुकता आता देशाला लागून राहिली आहे.

हेही वाचा- आर्यन खान ड्रग्स प्रकरण: ड्रग्स माफिया जयदीप राणा आणि अमृता फडणवीस यांचा फोटो व्हायरल; नवाब मलिक यांनी उघड केला संबंध

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड 

ड्रग्स प्रकरणात फडणवीसांचं नाव आल्याने,राष्ट्रवादीने दिलं  आव्हान; आम्ही तयार आहोत,नवाब मलिकही कडाडले 

रिषभ सजदेवा,काशिफ खान,अमिर फर्निचरवाला,प्रतिक गाभा,या ड्रग्स माफिया सोबत फडणवीसांचे संबंध; ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.