T-20 World Cup:कोण म्हणतं टी-ट्वेण्टी’वर्ल्डकप’नंतर कोहली कर्णधार पदाचा राजीनामा देणार? ‘कोहली’ची तर हकालपट्टी होणार!

0

२०१९च्या वर्ल्डकप ‘सेमीफायनल’मध्ये न्युझीलँडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर ‘विराट कोहली’च्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. विराट कोहलीची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या देखील त्यावेळी काही माध्यमांमधून समोर आल्या होत्या.

आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कर्णधार पदाची चर्चा पाठीमागच्या दोन दिवसांपासून जोर धरू लागली आहे. टी-ट्वेण्टी वर्ल्ड कपनंतर विराट कोहली आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वःताहून ‘व्हाइट बॉल’क्रिकेटची कॅप्टनशी सोडणार असल्याचे ‘वृत्त’ काही प्रिंट मीडियांनी छापले. आणि एकाच खळबळ उडाली.

टी-ट्वेण्टी वर्ल्डकप काही दिवसांवर आला असताना अचानक ही बातमी क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणारी आहे. मात्र या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे.

‘AINS’ या वृत्त संस्थेशी बोलताना ‘BCCI’चे कोषाध्यक्ष ‘अरुण धुमाळ’ यांनी हे ‘वृत्त’ फेटाळून लावले आहे. ‘वर्ल्डकप’नंतर विराट व्हाइट-बॉल क्रिकेटची कॅप्टनशी सोडणार असल्याची कोणतीही चर्चा विराट आणि क्रिकेट बोर्डमध्ये झालेली नाही. असे सांगून ‘अरुण धुमाळ’ यांनी गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.

 

जर BCCI आणि ‘विराट कोहली’ यांच्यामध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नाही,तर मग ही बातमी अनेक महत्वाच्या प्रिंट मीडियामध्ये आली कशी? खरंच ही बातमी अफवा होती?

टी-ट्वेण्टी वर्ल्डकप झाल्यानंतर विराट कोहली ‘व्हाइट-बॉल’ क्रिकेटची ‘कॅप्टनशी’ सोडणार असल्याची कोणतीही चर्चा ‘BCCI’ आणि विराटमध्ये झालेली नाही. असं ‘अरुण धुमाळ’ यांनी सांगितले असले तरी,अनेक क्रिकेट चाहत्यांना यावर विश्वास बसणार नाही.

त्याचे कारण म्हणजे,कोणताही ‘BCCI’ शी संबंधित अधिकारी ‘पब्लिकली’ बोलताना अशी चर्चा झाल्याचे मान्यच करणार नाही. कारण त्याचे अनेक वाईट परिणाम संघावर पडू शकतात.

याचा अर्थ विराट आणि ‘क्रिकेट बोर्ड’ यांच्यामध्ये विराटच्या ‘कॅप्टन’ विषयी चर्चा झाली आहे. असे आपण म्हणायचं का? तर असं देखील आपल्याला ठाम म्हणता येणार नाही.

मात्र भारत टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला तर मात्र,विराट कोलीच्या नेतृत्वाचे विश्लेषण केले जाऊ शकते. फक्त विश्लेषणच नाही तर,विराटची व्हाइट बॉल क्रिकेटच्या ‘कर्णधार’ पदावरून हकालपट्टी केली जाण्याची दाट शक्यता आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.

महेंद्रसिंग धोनीची टी-ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये ‘मेंटॉर’ म्हणून झालेली निवड अप्रत्यक्ष कोहलीचे महत्व कमी करणारी असल्याचे,कदापीही नाकारता येणार नाही.

जर भारताने टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकला तर साहजिकच ‘धोनी’चं कौतुक होताना पाहिला मिळेल. फक्त कौतुकच नाही तर,पन्नास टक्क्याहून अधिक या विजयाचं ‘श्रेय’ धोनीला मिळेल,हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

मात्र जर भारत टी-ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला तर,पराभवाचं सगळं खापर ‘विराट कोहली’च्या डोक्यावर फोडलं जाईल,हे देखील वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये ‘विराट कोहली’च्या कर्णधार पदावरून ‘जी’ चर्चा सुरू आहे,त्या गोष्टीचा विचार केला तर,विराट कोहली प्रचंड दबावात तर असेलच,मात्र याचा भारतीय संघावर देखील खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सगळ्या प्रकरणानंतर ‘विराट कोहली’च्या नेतृत्वात भारतीय संघ ‘टी-ट्ेण्टी वर्ल्ड’ कपमध्ये कशी कामगिरी करतोय? हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.

त्याचबरोबर माध्यमांमध्ये ‘विराट कोहली’च्या ‘कॅप्टन’ विषयी आलेल्या वृत्तात ‘काही’ तथ्य आहे की नाही? येणाऱ्या काळात ‘विराट कोहली’ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असणार की नाही? हे आपल्याला टी-ट्वेण्टी विश्वचषकानंतरच अधिक समजणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.