Akshay Borhade Arrest : स्वतः ला शिवभक्त म्हणून घेतो, मग मुलींना लॉजवर का घेऊन जातो?

0

Akshay Borhade Arrest : गेल्या काही दिवसांपासून बोराडे हॉटेल चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षय बोराडे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला होता कारण जुन्नर चे सत्यशिल शेरकर यांच्याशी झालेल्या वादामुळे अक्षयने (Akshay Borhade Arrest) महाराष्ट्रभर सहानभूती निर्माण केली होती. तृप्ती देसाई यांनी अक्षय बोराडे हा मनोरुग्णांच्या किडन्या विकण्याचे काम करत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी मात्र महाराष्ट्रभर अक्षय बोराडे याने आपली पाठ थोपटून घेतली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेले शिवरून प्रतिष्ठान त्या प्रतिष्ठान चा अक्षय हा संस्थापक आहे.

अक्षय बोराडे हा मनोरुग्णांची सेवा करण्याचे नाटक करून मनोरुग्णांच्या किडन्या विकत असल्याचे बोलले जात होते. समाजसेवक म्हणून सोशल मीडियावर ओळख असलेल्या अक्षय बोराडे या तरुणाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. आपल्या देशासह महाराष्ट्र राज्यात हीच खंत पाहायला मिळते की, लोक समाजसेवक, राजकारणी व चांगला चेहरा जगासमोर घेऊन आतून किती काळे धंदे करत असतात.

नुकतीच अक्षय बोराडे याला जुन्नर येथील व्यापाऱ्याला खंडणी साठी धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवसेनेकडून देखील अक्षय बोराडे याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. अक्षय बोराडे हा तरुण जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जुन्नर नगरपालिका या विषयांवर बेजबाबदारपणे टीका करत आहे. त्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या बाबतीत टीका केली आहे. यामध्ये जुन्नर चे नगराध्यक्ष यांच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी अक्षय बोराडे अशाप्रकारे टीका करत आहे असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

नुकतेच त्याच्या पत्नीकडून अक्षय बोराडेचे कारनामे उघड करण्यात आले आहेत. त्याच्या पत्नीने अक्षयने आपली फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. अक्षय बोराडेची पत्नी म्हणाली माझ्यावर खूप अन्याय झाला आहे. अक्षयची व माझी ओळख सोशल मीडियावर झाली आहे. त्याचा मनोरुग्णांना सेवा करत असल्याचा व्हिडिओ मी पाहिला होता. त्यानंतर मी माझ्या भागातील मनोरुग्णांची माहिती अक्षय याला दिली होती. तो म्हणाला मी सध्या तिकडे येत नाही व त्याने माझा व्हॉटसअप नंबर घेतला.

त्यानंतर तो मला सकाळी व सायंकाळी “गुड नाईट, गुड मोर्निंग” असे संदेश पाठवत होता. त्यानंतर अक्षयने काही दिवसातच मला प्रोपज केले, मी त्याला नकार दिला. त्याचे व माझे बोलणे चालूच होते. काही काळानंतर त्याच्या व माझ्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मी त्याला छ्त्रपती शिवरायाच्या नावाने समाजसेवा करत असल्यामुळे चांगले समाजात होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यानं मला जुन्नरला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला सांगितले. त्याच्या आईशी माझे बोलणे झाले. नंतर मात्र अक्षयने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला व तो मला म्हणाला जा तुला काय करायचे ते कर. माझ्यासोबत रिलेशन ठेऊन देखील त्याने मला लग्नाला नकार दिल्याने मी विष प्यायले. नंतर मला भेटण्यासाठी तो दवाखान्यात आला. नंतर आमचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मला काही दिवस चांगली वागणूक मिळाली नंतर माझा छळ करण्यात आला.

अक्षयने आत्तापर्यंत अनेक मुलींची फसवणूक केली आहे. तो मुलींना घेऊन लॉजवर जातो. तो मला मुलगा झाल्यानंतर भेटायला देखील आला नाही व म्हणाला तुझ्या मुलाचा व माझा काहीही संबंध नाही. अक्षयच्या ड्रायव्हरने मला सर्व सांगितले आहे. शिवऋण प्रतिष्ठान हे मिळकतीचे साधन आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून येणाऱ्या पैशाच्या जोरावर तो चैन करत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीकडून करण्यात आला आहे. सोबतच तो मनोरुग्णांना गायब करत असल्याचे देखील ती म्हणाली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.