Nandkumar Bhoite: फलटणचे‌ उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे निधन.

0

फलटण नगरीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे ( NandkumarBhoite ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. २७ ऑगस्ट रोजी लेह लडाख येथे त्यांचा मृत्यू झाला. नंदकुमार भोईटे यांची निधन वार्ता समजताच फलटण शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नंदकुमार भोईटे हे गेले ३५ वर्ष फलटण‌ नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून काम करत आहेत. ( Former Phaltan mayor and current deputy mayor Nandkumar Bhoite has died of a heart attack.)

आपल्या वेगवेगळ्या कल्पना रबावून अनेक वेगवेगळे प्रयोग त्यांनी फलटणच्या विकासासाठी केले आहेत. नंदकुमार भोईटे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी वर्षभरापूर्वी फलटण शहरातील डेक्कन चौकाचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सजाई गार्डन येथे चालू केलेले कोरोना केअर सेंटर हे देखील त्यांच्या माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.

नंदकुमार भोईटे हे राजकीय सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर आपल्या उद्योग व्यवसायात देखील पारंगत होते. एक यशस्वी उद्याजक म्हणून देखील ते प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव फलटण येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणार आहे.

फलटण तालुक्यातील बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा. 

https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.