स्मार्टफोन क्षेत्रातील Realme India नवीन स्मार्टफोन Realme C21Y भारतात करणार लाँच

0

Realme C21Y : स्मार्टफोन क्षेत्रातील अग्रणी कंपनी Realme India भारतीय बाजारामध्ये आपला स्मार्टफोन Realme C21Y भारतात लाँच करणार आहे. कंपनीच्या वेबसाईट वरून ही माहिती देण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी हा स्मार्टफोन सादर करण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीने  Triple Rear Camera  सेटअप दिला आहे.  Realme C21Y मोबाईलमध्ये प्रायमलाँचरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा  देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा हा कंपनीकडून 5 Megapixel चा देण्यात आला आहे.    Realme C21Y0 हा स्मार्टफोन Unisoc T610 SoC ने सपोर्टेड आहे.  स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh ची  आहे.  पाठीमागच्या   बाजूला Fingerprint Scanner  उपलब्ध आहे.  (Realme C21Y smartphone will launch on 23rd august in India, check price and features)

Realme.com या कंपनीच्या अधिर्कृत वेबसाईटवर  एक मायक्रोसाइट  तयार करण्यात आली आहे. यावरुन अशी माहिती मिळाली आहे की,  स्मार्टफोन क्रॉस ब्लू आणि क्रॉस ब्लॅक कलर या दोन कलर मध्ये भारतीय बाजारपेठत  लॉन्च केला जाईल. जुलै मध्ये हा स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत व्हिएतनाममध्ये जेवढी आहे तेवढीच भारतात सुद्धा असणार आहे.  Realme C21Y 3GB + 32GB मॉडेलची किंमत जवळपास 10,500 रुपये  असेल व 4GB + 64GB मॉडेलची किंमत जवळपास 12,000 रुपये  इतकी असेल. (10 to 12 Thousand Range Price smartphone )

Realme C21Y स्मार्टफोन Android 10 वर आधारित Realme UI वर आधारित आहे. कंपनीकडून 6.5-इंच HD + (720 × 1,600 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन Mali-G52 GPU सह कनेक्ट असलेल्या Unisoc T610 SoC द्वारे सपोर्टेड आहे. यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्पेस आहे. ही स्पेस तुम्हाला जी स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.