गजानन मारणेचे गुन्हेगारी साम्राज्य नष्ट करणार असे कोण म्हणाले?

टोळीयुध्दमधून विरोधी गटातील दोघांचा खून केल्याप्रकरणी गेली सहा वर्ष मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड गजानन मारणे याची सबळ पुराव्याअभावी  या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. गजानन मारणेच्या  समर्थकांनी तळोजा जेल ते पुणे अशी दिडशे किलोमीटर गाड्यांची रॅली काढली होती.

गजानन मारणे याच्या राजरोसपणे काढण्यात आलेल्या रॅलीमुळे पोलिसांवर सर्वसामान्य जनता बोट ठेऊ लागली होती. त्यामुळे गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड  गजानन मारणेला दणका देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.  गजा मारणेचं गुन्हेगारी साम्राज्य पूर्णपणे उद्धवस्त करणार असल्याचा  इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

पुणे पोलिसांनी अशा प्रकारे  आक्रमक भूमिका घेतल्यामुळे  मारणे याच्या मनात चांगलीच धडकी भरली असणार, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे अशी एकूण १५० किमी जंगी मिरवणूक काढली होती. एका गुंडाच्या समर्थनार्थ  शेकडो वाहनांचा ताफा या मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यामध्ये नुकतीच तरुणाईत प्रवेश केलेल्या मुलांची संख्यादेखील प्रचंड होती.

तसेच तळोजाहून पुण्यात येताना वारजे पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हद्दीत नियम पाळायला सांगण्यासाठी आलेल्या पोलिसांना गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांनी धक्काबुक्की केली होती. याबाबत गजा मारणे याच्यावर  वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला  होता. मात्र गजानन मारणे हा अटकेच्या भीतीपोटी फरार झाला असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  असे प्रसिद्धीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.