‘उंबरवांगन’शेतकऱ्यांची बाजारपेठेची मागणी; ‘मोगरा’ पिकापासून लाखोंचे उत्पादन
वाडा प्रतिनीधी-दिपक साळुंखे,
पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लाेकवस्ती कसलेला दऱ्या-खोऱ्यानी व्यापलेला तालुका असून या दऱ्या खोऱ्या मध्ये,नागली,उडीद यांसारखी पिके घेतली जात आहेत.
दऱ्याखोऱ्यामध्ये राहत असलेला आदिवासी बांधव पावसाळी शेती व्यतिरिक्त माेगरापिकाचे उत्पादन घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाडा विक्रमगड जव्हार या राज्य महामार्गालगत वसलेले ‘उंबरवांगन’ हे गाव असून या गावातील सर्वच आदिवासी कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी माेगरापिकाचे उत्पादन घेत आहेत.
या उंबरवांगन गावातील बहुतेक नागरिक माेगरापिकाचे उत्पादन घेत असल्याचे दिसून येत आहे.
या गावातील काही शेतकऱ्यांना पाणी व लाईट यांची समस्या आहे. तसेच विक्रीसीठी जवळ बाजारपेठ उपलब्धही नाही. त्यामुळे दादर मुंबई येथे पिकलेला आपला माल घेऊन जावे लागते.
काही आदिवासी कुटुंब राज्य महामार्गावर माेग-याचे गजरे करुन विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दऱ्याखोऱ्यामधील असलेल्या खडकाळ जमीमध्ये देखील काही कुटुंबे वर्षाकाठी लाखों रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. शासनाने पाण्याची सोय व बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास आमच्या आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती निश्चित सुधारेल असं,या बांधवांकडून सांगण्यात आलं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम