वाडा नगरपंचायतीच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन.

0

वाडा- प्रतिनिधी,दिपक साळुंखे,

वाडा नगरपंचायतींच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी आज शनिवार सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


वाडा ( खंडेशवरी नाका) ते परळी नाका येथपर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. वाडा नगरपंचायतींच्या नगर अध्यक्षा साै. गीतांजली काेलेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली. याप्रसंगी वाडा नगरपंचायतींच्या उपनगराध्यक्षा साै.वर्षा गाेळे, नगरसेविका साै. भारती सपाटे, साै. शुभांगी धानवा,नगरसेवक रामचंद्र जाधव,वैभव भाेपतराव,कार्यालयीन अधिक्षक दिनेश घायघायवट उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.