जगातील सर्वात घाणेरडा माणूस… या कारणामुळे त्याने ६७ वर्षामध्ये एकदाही आंघोळ केली नाही.

0

थंडीच्या ऋतूमध्ये  अंघोळ करण्यास अनेकजण कंटाळा करत असतात. परदेशामध्ये तर थंड हवामानामुळे अंघोळ करण्यास लोक टाळतात. थंडीमध्ये पाण्यापासून लांब राहण्यालाच अनेकजण प्राधान्य देतात. मात्र जगामध्ये अशी एक व्यक्ती  आहे ह्या व्यक्तीने मागील ६७ वर्षांपासून एकदा सुध्दा अंघोळ केलेली नाही.

अमो हाजी नामक ही व्यक्ती आहे. या व्यक्तीने मागील 67 वर्षांपासून  साधं आपलं तोंड देखील धुतलेलं नाही. या व्यक्तीचं वय ८७ वर्ष असून त्याने वयाच्या २० व्या वर्षापासून एकदा सुध्दा  अंघोळ केलेली नाही व तोंड देखील धुतले नाही. 

इराणच्या दक्षिणेला असणारता देगाह गावामध्ये अमो  हे राहत असतात. त्यांच्या संपूर्ण शरीरावरती धूळ आणि राख  जमल्यासारखं वाटतं. एखाद्या धुराच्या नळकांड्यामधून बाहेर आल्यानंतर ज्याप्रमाणे त्वचा ही  काळवंडल्यासारखी वाटते तशी अमो यांची त्वचा व चेहरा आहे.

वास्तविक पाहता अमो यांना पाण्याची प्रचंड भीती वाटते. म्हणूनच ते मागील ६७ वर्षांपासून एकदाही अंघोळ केलेली नाही. आपण अंघोळ केली तर आपण  आजारी पडू शकतो अमो यांना वाटतं. शरीर स्वच्छ ठेवल्यामुळे त्या स्वच्छतेमुळेच आपण आजारी पडू शकतो  असा अमो यांचा गैरसमज आहे.

अमो यांची रहाणीमान देखील अगदी विचित्र आणि वेगळी आहे. अमो यांना  जानवराचे सडलेलं मांस खायला खूप आवडते. खास करुन अमो  यांना साळींद्राचं  मांस त्यांना विशेष आवडतं. अमो एकाच वेळी पाच सिगारेट पितात. 

अमो यांचं रहाणीमान सुध्दा अगदी विचित्र आहे.  अमो यांना जानवरांचे सडलेले मांस खायला खूप आवडतं.  साळींद्राचं मांस त्यांना विशेष आवडत आहे.  अमो हे विचित्र राहणीमान असणारे व्यक्ती आहेत ते एकाच वेळी पाच सिगारेट पितात. 

अमो यांना  धुम्रपान करण्याचे व्यसन आ आहे. अमो यांची धुम्रपान करण्याची सवय देखील अगदी किळसवाणी आहे. त्यांच्याकडे असलेल्या एका जुन्या सिगारसारख्या पाईपमध्ये प्राण्यांचा सुकलेला मैला जाळून त्या सिगारचा धुम्रपानासाठी वापर करतात.

अमो हाजी हे थंडीपासून स्वतःला वाचण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घालतात व फिरत असतात. अमो हे आपले केस कापण्यासाठी चक्क आगीचा वापर करतात. आगीच्या मदतीनेच आपल्या शरीरावरील केस कापतात.

त्यांना पाण्याची भीती वाटते परंतु  तरी ते त्यांच्याकडे  असणाऱ्या  गंजलेल्या मोठ्या आकाराच्या भांड्याचां वापर करून रोज पाच लीटर पाणी पितात. अमो हे जमीनीतील मोठमोठे खड्डे, पडलेल्या इमारतींच्या आडोश्याला रहात आहेत. त्यांची अशी अवस्था पाहून काही लोकांनी त्यांना पुढाकार घेऊन  एक कच्च्या भिंती असणारा एक निवारा बांधून दिला आहे.

अमो यांना चारचाकी गाड्यांच्या साईड मिररमध्ये स्वत:ला पाहायला खूप आवडतं.   तरुण वयामध्ये अमो यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्या मनावर  खूप मोठा भावनिक आघात झाला होता व  तेव्हापासून त्यांनी अशाप्रकारे एकांतात आपले जीवन जगण्याचा निर्णय घेतला. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.