भाजपा आमदार ‘कुलदीप सिंग सेंगर’ यांच्या विरोधात बलात्काराची केस लढणाऱ्या,वकिलांचाही मृत्यू! उन्नाव प्रकरणात किती जणांचा मृत्यू झाला? वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश आणि गुन्हेगारी हे समीकरण गेल्या काही वर्षापासून अधिक दृढ झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश राज्यात अत्याचाराच्या घटना आपणास वारंवार ऐकायला,वाचायला मिळत असतात. काही वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले होते.

उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर पीडितेचे वडील आणि त्यांचा मित्र गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. पोलिसांनी एफ आय आर रजिस्टर करण्याऐवजी या दोघांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत पिडीतेच्या वडिलांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत गेलेल्या त्यांच्या मित्राचा देखील काही दिवसानंतर संशयास्पद मृत्यू झाला होता.

ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता,त्यामधील एक जण उन्नावचे आमदार कुलदीप सिंग सेंगर यांचे भाऊ होते. आणि म्हणूनच पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास तयार नव्हते. मात्र पीडितेच्या वडीलांचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्यानंतर, राजकीय दबावनंतर गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढे या केसचा निकाल लागला आणि भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर याला दहा वर्षांची शिक्षा झाली. परंतु ही केस चालू असताना,अनेक चित्रविचित्र घटना घडल्या. बलात्कार पीडिता आपल्या कुटुंबासोबत एका चार चाकीमध्ये जात असताना एका अज्ञात ट्रकने कारला धडक दिली. विशेष म्हणजे धडक दिलेल्या ट्रकची नंबर प्लेट काळी केली होती. या अपघातात पीडितेच्या काकी आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पीडितेचा वकील आणि पिडीता हे दोघेही गंभीर जखमी झाले होते.

पिडीतेचे वकीलपत्र घेणारे अॅड. महेंद्र सिंग माखी हेदेखील या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांचे मल्टिऑर्गन डॅमेज झाल्याने त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला. कुलदीप सिंग सेंगर आणि इतरांनी केलेला गुन्हा सिद्ध होईपर्यंत या प्रकरणाने एकूण पाच बळी घेतले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.