विराट कोहलीची फलंदाजी आवडते,मात्र व्यक्ती म्हणून आम्ही त्याचा तिरस्कार करतो!

0

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीला सातत्याने ट्रोल केलं जातंय. विराट कोहलीवर सातत्याने टीका होताना पाहायला मिळतेय. कधी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर कधी तो व्यक्ती म्हणून परिपक्व नाही असं बोललं जातंय.

आयपीएलमध्ये विराट कोहलीला अद्याप एकदाही विजेतेपद जिंकता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर काही दिवसापूर्वी अनेक दिग्गजांनी टीका केली होती. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वीरेंद्र सेवाग,मायकल वॉन,गौतम गंभीर या दिग्गजांनी विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा उत्कृष्ट नेतृत्व करू शकतो,असं विधान केलं होतं.

विराट कोहलीने देशवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने शुभेच्छा देताना पर्यावरणाचे आपण सर्वांनी रक्षण केले पाहिजे. फटाक्याविना दिवाळी साजरी केली पाहिजे. आणि प्रदूषण टाळले पाहिजे. असं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करताना विराटने म्हटलं होतं. मात्र विराट कोहलीने दिलेला हा संदेश देशवासीयांना रुचला नाही. आणि त्यांनी विराट कोहली याच्यावर खुप खालच्या दर्जाची टीका केली होती. चाहत्यांनी “अनुष्का अपना कुत्ता संभाल” असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंन्ड केला होता. हा हॅशटॅग दिवसभर ट्विटरवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेडिंगला होता.

काल पुन्हा एकदा,ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने विराट कोहली विषयी मोठे विधान केले आहे. टिम पेन म्हणाला,विराट कोहलीची फलंदाजी पाहिला आम्हाला खूप आवडतं,मात्र व्यक्ती म्हणून तो आम्हाला आवडत नाही. व्यक्ती म्हणून आम्ही त्याचा तिरस्कार करतो असं टिम पेन म्हणाला. टिम पेनने केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. टिम पेनच्या या विधानावर विराट कोहली काय प्रतिक्रिया देतो?हे पाहणे खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन ट्वेंटी-ट्वेंटी, तीन वनडे आणि चार टेस्ट असा हा दौरा आहे. दौरा सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आतापासूनच माईंड गेम सुरू केला आहे. या दौराकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.