पंतप्रधान मुद्रा योजनेबद्दल जाणून घ्या, तुमच्या फायद्याची योजना, कोण घेऊ शकते या योजनेचा फायदा?
सन २०१५ पासून केंद्र शासनाने पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हा की एखाद्या व्यक्तीला त्याचा छोटासा व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्रशासन या योजनेद्वारे नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी ही योजना चालू झाली. या योजनेचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात १) शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन हे प्रकार आहेत. शिशु लोन अंतर्गत ५०,००० पर्यंत कर्ज दिले जाते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शिशु लोन अंतर्गत कर्ज घेणाऱ्या लोकांना २ टक्के व्याज केंद्राकडून अनुदान स्वरूपात भरले जाणार आहे. किशोर लोन अंतर्गत ५० हजार ते ५ लाखापर्यंत कर्ज मिळते. त्याचसोबत तरूण लोन मध्ये ५ लाख ते १० लाखापर्यंत लोन मिळते.
आजकाल वाढत चाललेली बेरोजगारी ही देशापुढील फार मोठे आव्हान आहे. या योजनेचा फायदा घेऊन याद्वारे नवीन उद्योग उभा राहिल्यामुळे लोकांच्या हाताला देखील काम मिळेल.
पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत अर्ज करू शकता. पंतप्रधान मुद्रा योजनेचा व्याजदर फिक्स असा नाही. या योजनेचा व्याजदर हा वेगवेगळ्या बँकेंचा वेगवेगळा असू शकतो. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्या नावावर तुमचे स्वतःचे घर मालकीचे कागदपत्र,आधार कार्ड, पॅनकार्ड, तुम्ही चालू करत असलेला व्यवसाय त्याविषयी माहिती बँकेला देणे गरजेचे आहे.अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा. https://mahamudra.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
आमच्या व्हॉटसअप ग्रुपला खालील लिंक वर क्लिक करून जॉईन https://chat.whatsapp.com/IFIoND2u38zEC4qxC8CUQD
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम