Virat kohli T20 World Cup update : ..अखेर विराट कोहली षडयंत्राचा बळी; T20 World Cup मध्ये विराट असणार की नाही ‘या’ गणितावर अवलंबून..

0

Virat kohli T20 World Cup update : आयपीएलचा (IPL) बिगुल वाजला असला तरी क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या आहेत. विराट कोहली (Virat Kohli) T20 विश्वचषक (T20 World Cup) खेळणार नसल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर, विराट कोहलीचे चाहते प्रचंड संभ्रमात पडल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएल काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना टी-ट्वेंटी विश्वचषकाचे देखील वेध लागले आहेत.

हार्दिक पांड्याच्या (hardik Pandya) दुखापतीमुळे भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) देण्यात आली. रोहित शर्मा हाच आगामी t20 विश्वचषकात कर्णधार असेल असं बीसीसीआयचे BCCI सेक्रेटरी जय शहा (jay shah) यांनी देखील केले. साहजिकच रोहित शर्मा (rohit sharma) T-20 विश्वचषक खेळणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे विराट कोहली (Virat kohli) विषयी जय शहा यांनी मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. साहजिकच त्यामुळे विराट कोहली षड्यंत्राचा बळी बनवला जात असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

एकीकडे विराट कोहलीचे टी-ट्वेंटी आकडे दमदार असले तरी विराट कोहलीला भारतीय टी ट्वेंटी संघात स्थान दिले जाणार नसल्याची चर्चा आहे. केवळ चर्चाच नाही, तर बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी विराट कोहली टी-ट्वेंटी विश्वचषक संघात असेल की नाही, यावर अद्याप निर्णय झालेल्या नाही. आयपीएल नंतर विराट कोहलीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

एकीकडे रोहित शर्माचे टी ट्वेंटी आकडे चांगले नसताना देखील त्याला भारतीय संघात संधी दिली गेली आहे. मात्र विराट कोहलीला 2014, 2016, 2022 टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तरीदेखील विराट कोहलीची आयपीएलच्या कामगिरी नंतर निवड केली जाणार आहे. खरंतर हे एकप्रकारचे षडयंत्र असून, विराट कोहलीला टी ट्वेंटी संघातून वगळण्याचं निश्चित झाले आहे. आणि केवळ त्याचसाठी आयपीएलच्या कामगिरीची निवड ही अट ठेवल्याचं बोललं जात आहे.

टी ट्वेंटी विश्वचषक वेस्टइंडीजमध्ये होणार आहे. वेस्टइंडीजच्या खेळपट्ट्या संथ आहेत. अशा खेळपट्टीवर विराट कोहली एक्स फॅक्टर ठरू शकतो. मात्र तरी देखील विराट कोहलीला वगळण्यात येणार असल्याच्या चर्चाने अनेकांना धक्का बसला. भारतीय संघात अखेरच्या षटकात सामना फिनिशिंग करणाऱ्या फलंदाजाची उणीव रिंकू सिंहने भरून काढली आहे. साहजिकच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामाविष्ट होण्यासाठी विराट कोहलीचा बळी दिला जाणार असल्यामुळे आता स्पष्ट झालं आहे.

अशा परिस्थितीत भारताच्या प्लेइंग11 मध्ये रिंकू सिंहला संधी दिली जाणार आहे. साहजिकच त्यामुळे विराट कोहली भारताच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळताना दिसत नाही. साहजिकच विराट कोहलीला बाहेरचा रस्ता दाखवला लागेल. यासाठी देखील टीम मॅनेजमेंट इच्छुक नसल्याची माहिती आहे. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह या दोघांनाही भारताच्या प्लेइंग 11 मध्ये खेळवण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि रोहित शर्माही (rohit sharma) इच्छूक आहेत.

हे देखील वाचा Dhanashree Verma affair : ..त्या अफेरनंतर धनश्री वर्माचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; म्हणाली आम्ही..

Rohit Sharma vs Shreyas Iyer : रोहित शर्माने कान टोचल्यानंतर श्रेयस अय्यरनेही घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या दोघांचा वाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.