Dhanashree Verma affair : ..त्या अफेरनंतर धनश्री वर्माचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; म्हणाली आम्ही..
Dhanashree Verma affair : भारतीय संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलची (Yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकत्याच झलक दिखला जा (Jhalak Dikhhla Jaa) या ‘रियालिटी शो’ची धनश्री भाग होती. या डान्स शोमध्ये ती फायनलिस्ट देखील राहिली. धनश्री वर्मा प्रोफेशनने डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. मात्र युजवेंद्र चहल सोबत विवाह केल्यानंतर, ती अधिक चर्चेत आली. बऱ्याच दिवसांनंतर धनश्री वर्माच्या पुन्हा एकदा अफेरच्या चर्चा रंगल्याने खळबळ उडाली आहे. (Dhanashree Verma affair)
यापूर्वी धनश्री वर्मा आणि भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या दोघांमध्ये अफेर असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा रात्री सूर्यकुमार यादवच्या (suryakumar yadav) घरी डिनर करण्यासाठी गेल्याने, या चर्चाला अधिक जोर आला होता. माध्यमांकडून या संदर्भात बातम्या प्रसारित झाल्यानंतर, धनश्री वर्मा सोशल मीडिया वरून खुलासा केली. ती म्हणाली, आम्ही दोघे चांगेल मित्र आहोत. यापेक्षा दुसरं काहीही नाही.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंट करून दोघांच्या रिलेशनशिप विषयी खुलासा केल्याने, या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा धनश्रीचे इतर पुरूषासोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगली आहे. कोरिओग्राफर प्रतीक उतेकर (pratik utekar) आणि धनश्री वर्मा या दोघांचे अफेअर सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
या दोघांमध्ये अफेअर सुरू असण्याचे कारण म्हणजे, दोघांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो प्रचंड रोमँटिक अंदाजात असल्याने, या चर्चांनी अधिक जोर धरला. साहजिकच या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्याने, चहलची पत्नी धनश्री वर्माने अखेर आपले मौन सोडले आहे.
धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिने या चर्चांविषयी आपण प्रचंड दुखी असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर अनेकांकडून नकारात्मक निम्स, व्हिडिओ पोस्ट केले जातात. या गोष्टीचा मला काही फरक पडत नाही. मात्र माझ्या कुटुंबियाला आणि माझ्या काही जवळच्या व्यक्तींना फरक पडतो. मी देखील माणूस असल्याने, काही प्रमाणात मी देखील डिस्टर्ब होते.
सोशल मीडियावर (social media) तुम्हाला काहीही लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार आहे. मात्र यामुळे तुम्ही आमच्या भावनांचा किंचितही विचार करत नाही. त्यामुळे तुम्ही कृपया याकडे लक्ष द्या. धनश्री वर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट करून एका व्हिडिओच्या माध्यमातून नेटकर्यांना भावनिक आव्हान केले आहे. साहजिकच कोरिओग्राफर प्रतीक उतेकर आणि धनश्री वर्मा हे दोघेही केवळ चांगले मित्र आहेत. या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त कोणतेही रिलेशनशिप नसल्याचा खुलासाही धनश्रीने केला आहे.
हे देखील वाचा Rohit Sharma vs Shreyas Iyer : रोहित शर्माने कान टोचल्यानंतर श्रेयस अय्यरनेही घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या दोघांचा वाद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम