Rohit Sharma vs Shreyas Iyer : रोहित शर्माने कान टोचल्यानंतर श्रेयस अय्यरनेही घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या दोघांचा वाद..

0

Rohit Sharma vs Shreyas Iyer : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताच्या नवीन संघाने इंग्लंडचा मालिका पराभव केला. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा सामना जिंकताच भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. 7 मार्चपासून आता पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला सुरुवात होणार आहे. संघाच्या दृष्टीने पाचवा सामना औपचारिकता असल्याने, संघात काही बदल देखील होण्याची शक्यता आहे.

पहिल्या डावाच्या पिछाडीनंतर चौथा कसोटी सामना आश्चर्यकारक जिंकल्यानंतर रोहित शर्माने (rohit sharma) नवीन खेळाडूंचे तोंड भरून कौतुक केलं. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अनेक विषयांवर भाष्य केलं. यामध्ये त्याने नवीन खेळाडूंचे कौतुक करताना काही जुन्या खेळाडूंना चपराक देखील लगावली. रोहित शर्माने केलेले विधान चर्चेत असतानाच, आता श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) रोहित शर्माचं म्हणणं चांगलेच मनावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

नवीन खेळाडूंची कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला होता, नवीन खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. त्यांच्यामध्ये भूक असल्याचे स्पष्ट जाणवत आहे. आम्ही केवळ ज्या खेळाडूंना भूक आहे, अशाच खेळाडूंना संधी देत आहोत. ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यामध्ये रस, भूक नाही. त्यांना खेळवून काही फायदाही नाही. कोणाला भूक नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे उगीच त्यांना संधी देण्यात देखील अर्थ नाही. असं रोहित शर्मा म्हणाला होता.

आपल्या विधानामध्ये रोहित शर्माने कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा रोख हा ईशान किशन (ishan Kishan) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या तिघांकडे होता. असं देखील बोललं गेलं. त्याचे कारण म्हणजे, ईशान किशन, श्रेयस अय्यर या दोन्ही खेळाडूंना राहुल द्रविड (rahul Dravid) आणि बीसीसीआयने देखील रणजी ट्रॉफी (ranji trophy) खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र रोहित शर्माच्या कान टोचणीनंतर श्रेयस अय्यरने एक पाऊल मागे घेतले आहे.

श्रेयस अय्यरने दुखापतीचे कारण देत मुंबई आणि बडोदा यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. शर्माने केलेल्या विधानानंतर मात्र आता श्रेयस अय्यर रणजी क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला आहे. दोन मार्चपासून तमिळनाडू विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये उपांत्य फेरीतचा सामना होणार आहे. आपण पूर्णपणे फिट झालो असून, उपांत्य फेरी सामना खेळणार असल्याचं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.

कसोटी क्रिकेट विषयी गांभीर्य नसलेल्या, भूक नसलेल्या खेळाडूंना आम्ही भारतीय संघात संधी देणार नसल्याचे रोहित शर्माने जाहीर केले. रोहित शर्माच्या विधानानंतर श्रेयस अय्यरच्या आपल्याला आता भारतीय संघात लवकर संधी मिळणार नाही हे लक्षात आले. आणि त्याचमुळे रणजी खेळण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आता क्रिकेट वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

हे देखील वाचा  Virat Kohli On test series : मालिका विजयानंतर अखेर विराट कोहली परतला; पाचव्या कसोटीत होणार हे तीन बदल..

Rohit Sharma-ishan Kishan : ..म्हणून त्यांना खेळवण्यात अर्थ नाही; रोहित शर्माच्या निशाण्यावर केएल राहुल, ईशानसह हे दोन खेळाडू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.