Virat Kohli On test series : मालिका विजयानंतर अखेर विराट कोहली परतला; पाचव्या कसोटीत होणार हे तीन बदल..
Virat Kohli On test series : रांचीच्या मैदानावर (Ranchi test) खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना जिंकत भारताने मालिकाही जिंकली. अनेक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय नवीन खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीचे आता सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. रोहित शर्माने देखील नवीन खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. कसोटी मालिका जिंकली असली तरी भारतीय संघ आता पाचवा सामना जिंकून मालिकेचा शेवट आणखी गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
चौथ्या कसोटी सामन्यापेक्षा पाचव्या कसोटीत भारतीय संघ अधिक ताकदवान बनून मैदानात उतरणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताचे अनेक प्रमुख खेळाडू परतणार आहेत. त्यामुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात काही बदल करून मैदानात उतरावं लागणार आहे. नवीन खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने केल्यानंतर, आता त्यांना बाहेर केलं जाणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरुवातीला विराट कोहली (Virat kohli) पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. मात्र दोन कसोटी सामन्यानंतर पुन्हा विराट कोहलीने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली. नुकतेच विराट कोहलीने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. विराट कोहली अनुष्का शर्माची (anushka sharma) प्रेंगन्सीच्या काळात काळजी घ्यावी, यासाठी त्याने मालिकेतून माघार घेतली. आणि आपल्या कुटुंबासोबत राहणं पसंत केले. अखेर या सगळ्या धावपळीतून विराट कोहली मोकळा झाला आहे. पाचव्या कसोटीपूर्वी तो अखेर परतला आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली अज्ञातवासात गेल्या प्रमाणे गायब झाला होता. विराट कोहली नक्की कुठे आहे? हे कोणालाही माहीत नव्हते. इतकंच नाही, तर तो इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून नक्की बाहेर का झाला आहे? हेही कोणाला नाहीत नव्हते. अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर, त्याने 15 तारखेला आम्हाला मुलगा झाला, असल्याचं 20 तारखेला जाहीर केले. तो पर्यंत तो सोशल मीडियावरून देखील गायब आला होता.
आता अखेर विराट कोहली सोशल मीडियावर परतला आहे. काल भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकल्यानंतर, विराट कोहलीने यंग टीम इंडियाचे खास अभिनंदन केले आहे. विराट कोहलीने आपल्या एक्स अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये नवीन संघाचे त्याने तोंडभरून कौतुक केले आहे. मालिका विजय साकारल्यानंतर, विराट म्हणाला, आमच्या युवा संघाने अभूतपूर्व मालिका जिंकण्यात यश मिळवले. नवीन संघाने कमालीची लवचिकता दाखवली. धैर्य, दृढनिश्चय या सगळ्याचे दर्शन आमच्या संघाने दाखवले.
पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) केएल राहुल (kl Rahul) या दोघांचे कमबॅक होणार असल्याची माहिती आहे. या दोघांच्या येण्याने आता रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटपुढे अंतिम 11 निवडणे आव्हानात्मक ठरणार आहे. रजत पाटीदारच्या (rajat Patidar) जागेवर केएल, तर आकाश दीपच्या (akash deep) जागेवर जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली मात्र पाचवा कसोटी सामना खेळणार की नाही, या विषयी स्पष्टताआली नाही.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम