Sarfaraz Khan Debut : रन आउटवर सरफराज खानच्या वडिलांची प्रतिक्रीया समोर आल्यानंतर जडेजानेही मागितली माफी..

0

Sarfaraz Khan Debut : राजकोट मैदानावर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Rajkot test) यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. काल पहिल्या दिवशी भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. काल रोहित शर्मा (rohit sharma) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) या दोघांनीही दमदार शतके झळकवली. मात्र या दोघांच्या शतकापेक्षा अधिक चर्चा सरफराज खानने (Sarfaraz Khan) खेळलेल्या इनिंगची झाली. मात्र दुर्दैवाने रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सरफराज खान (Sarfaraz Khan) धावबाद झाला.

सरफराज खान धावबाद झाल्यानंतर, रवींद्र जडेजाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, सरफराज खानचे वडील नौशाद खान (Naushad Khan) यांची सरफराज खानच्या रनआउटवर प्रतिक्रिया दिली. ज्याची देखील सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या चुकीमुळे सरफराज खान धावबाद झाल्याची जाणीव झाल्यानंतर, रवींद्र जडेजाने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे. ज्यांची देखील सध्या चर्चा सुरू आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारा सरफराज खानला अखेर भारतीय कसोटी संघात संधी मिळाली. दुखापतीमुळे अनेक महत्त्वाचे खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या मालिकेचा भाग नसल्याने, सरफराज खानला प्लेइंग11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे पुरेपूर सोने करताना सरफराज खानने अनेकांना आश्चर्यचकित केले. पदार्पणातच सरफराज खानने प्रचंड परिपक्वता दाखवत फलंदाजी केली. ज्यामुळे अनेकांकडून मोठ्या प्रमाणात त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

सरफराज खान फलंदाजी करताना हा त्याचा पहिलाच सामना आहे, असं कुठेही वाटत नव्हतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करण्याचा फायदा त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात होताना दिसला. दुर्दैवाने तो रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे धावबाद झाला. सरफराज खानने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. ज्यामध्ये नऊ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सरफराज खानचे वडील नौशाद खानने मीडियाशी बोलताना रन आउट विषयी देखील भाष्य केलं. नौशाद खान म्हणाले, रन आउट होणे हा एक खेळाचा भाग आहे. यामध्ये कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. अनेकदा एकमेकांच्या चुकांमुळे खेळाडू रनआउट होतात. यामधे नवीन काही नाही. सरफराज खानच्या नशिबात पदार्पणमध्ये तितक्याच धावा होत्या. पुढे संधी मिळाली तर तो पुन्हा मोठी खेळी साकारेल असेही ते म्हणाले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, रवींद्र जडेजाने देखील सरफराज खानची माफी मागितली. सरफराज खान धावबाद झाल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. तिथे अजिबात धाव नव्हती. मात्र धाव घेण्याचा तो माझा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता. मी त्याची माफी मागतो. सरफराज खान उत्तम खेळला. अशी इंस्टा स्टोरी ठेऊन रविंद्र जडेजाने त्याची माफी मागितली आहे.

हे देखील वाचा Virat Kohli T20 World Cup : विराट कोहली सोबत षडयंत्र? रोहित T20 संघात; मग विराट कोहली का नाही..

Chanakya Niti for husband-wife relationship: या तीन गोष्टी संपवतात पती-पत्नीचं हसतं खेळतं आयुष्य..

Jay Shah on Virat Kohli: T20 world Cup मध्ये रोहित कर्णधार, मग विराटला संधी का नाही? जय शहा म्हणाले..

Rohit Sharma T20 World Cup captain : रोहित T20 World Cup मध्ये कर्णधार; जय शहाची घोषणा; विराट कोहली मात्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.