Virat kohli Ram Mandir Inauguration: निमंत्रण असूनही विराट, धोनी, रोहितने राम मंदिर उद्घाटनाकडे का फिरवली पाठ? हे आहे कारण..

0

Virat kohli Ram Mandir Inauguration: रामाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Inauguration) स्थापनेचा कार्यक्रम आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मोहन भागवत mohan bhagwat) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या हस्ते पार पडला. भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक कलाकार आणि खेळाडूंनीही उपस्थिती दर्शवली. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महेंद्रसिंग धोनी, (mahendra singh Dhoni) विराट (Virat kohli) कोहली रोहित शर्मा (Rohit Sharma) या तिघांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका 25 जानेवारी पासून खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेमुळे भारतीय खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार की नाही, याविषयी अनेक प्रश्नचिन्ह होते. मात्र भारतीय संघातील काही खेळाडू राम मंदिर उद्घाटनासाठी आयोध्यामध्ये दाखल झाले आहेत. भारताचा माजी खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील या कार्यक्रमात पोहचला होता.

सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) बरोबर बॉलीवूड अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आलिया भट्ट रजनीकांत यांनी देखील हजेरी लावली. याबरोबरच क्रीडा विश्वातून सायना नेहवाल, रवींद्र जडेजा, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे हेही हजर राहिले. मात्र निमंत्रण असून देखील महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिघांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याकरे पाठ भिरावली आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी हे तीनही क्रिकेट विश्वातील खूप मोठी नावे आहेत. या तिघांच्या पाठीमागे खूप मोठा फॅन बेस आहे. या तिघांच्या कुठल्याही कृतीची मोठी बातमी होते. या तिघांनीही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पाठ फिरवल्याने आता अनेक उलट सुलट चर्चा देखील सुरू आहेत. महेंद्रसिंग धोनी वगळता विराट कोहली आणि रोहित शर्मा राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी का उपस्थित राहिले नाहीत? या संदर्भातले कारण देखील आता समोर आलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघासाठी प्रचंड महत्वपूर्ण मानली जात आहे. नवीन वर्षाची सुरुवात देखील भारतीय क्रिकेटसाठी चांगली झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्यात भारतीय संघाला अपयश आलं असलं तरी मालिका ड्रा करण्यात मात्र यश आलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या तीन t20 सामन्याची मालिका देखील भारताने 3-0 अशी जिंकली.

इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेची तयारी म्हणून, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघे उपस्थित राहिले नसल्याची माहिती आहे. महेंद्रसिंग धोनीने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याकडे का पाठ फिरवली, हे मात्र समजू शकले नाही. रोहित शर्मा आज दुपारी नेटमध्ये सराव करताना देखील पाहायला मिळाला.

हे देखील वाचा Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

SSY: घरात लहान मुलगी असेल तर लगेच करा हे काम; केंद्र सरकार देतंय तब्बल..

IPL 2024 date: T20 World Cup च्या पाच दिवस अगोदर IPL ची फायनल; कधी सुरू होणार आयपीएल..

Shoaib Malik Sana Javed: शोएब मलिकच्या लग्नानंतर सानियाकडून धक्का देणारी प्रतिक्रिया समोर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.