SSY: घरात लहान मुलगी असेल तर लगेच करा हे काम; केंद्र सरकार देतंय तब्बल..

0

SSY: महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. देशातील अनेक नागरिक सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेतात. मात्र अनेकांना केंद्र सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती मिळत नाही. खास करून केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते. लहान मुलीसाठी देखील केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. (Sukanya Samriddhi Yojana (SSY) मुलगी मोठी झाल्यानंतर सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने योजनाची सुरुवात केली आहे.

सरकारने सुरू केलेल्या योजनेसाठी मुलीच्या वयोमर्यादेची अट घालण्यात आली आहे. ज्या पालकांना दहा वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी असेल, अशा पालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेल्या रकमेवर तब्बल 7.6 टक्के व्याज देण्याचे काम केले जाते. या योजनेच्या अटी विषयी अधिक सांगायचे झाल्यास, पालक आपल्या मुलीच्या नावे कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत दरवर्षी गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणूक केलेली रक्कम पंधरा वर्षांसाठी भरावी लागणार आहे. मुलीने 21 वर्षे पूर्ण केल्यानंतर, तुम्ही ही रक्कम वापरण्यास पात्र होता. जर तुम्ही एक, दोन किंवा तीन हजार रुपये गुंतवणूक केली, आणि मुलगी एकवीस वर्षाची झाली तर तुम्हाला किती रक्कम मिळेल? जाणून घेऊया याविषयी सविस्तर..

1000 रुपये गुंतवल्यास किती रक्कम मिळेल?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जर तुम्ही महिन्याला एक हजार रुपये गुंतवले, तर 12 महिन्यात तुमची रक्कम बारा हजार होईल. 15 वर्ष जर तुम्ही या गुंतवणुकी नुसार रक्कम नियमितपणे भरत गेला तर तुमची रक्कम 1,80,000 होते. पंधरा वर्षानंतर एक लाख 80 हजार रुपयांचे व्याज 3,29,212 होते. तुमची मूळ रक्कम आणि व्याज मिळून तुम्हाला पाच लाख नऊ हजार दोनशे बारा रुपये दिले जातील.

2000 रुपये भरले तर किती रक्कम मिळेल?

तुम्ही जर दरमहा 2,000 रुपये गुतवले, तर तुमची एका वर्षाची रक्कम 24,000 हजार रुपये होईल. 15 वर्ष जर तुम्ही नियमितपणे महिन्याला 200 हजार रुपये भरले तर एकूण 3,60,000 रुपये इतकी रक्कम तुम्ही भराल. या रकमेवर तब्बल 6,58,425 रुपये व्याज मिळाले. व्याज आणि तुमची मूळ रक्कम. मिळून तुम्हाला 10,18,425 इतकी रक्कम मिळेल.

3000 गुंतवल्यास किती रक्कम मिळेल.

जर तुम्ही महिन्याला 3000 रुपये गुंतवले, तर एका वर्षाला तुमची रक्कम 36,000 होईल. 15 वर्ष ही रक्कम नियमितपणे भरली तुमची सगळी मिळून गुंतवणूक 5,40,000 इतकी होईल. 5,40,000 या रकमेचे व्याज 9,87,637 इतके होईल. व्याज आणि तुमची गुंतवणूक रक्कम मिळून 15,27,637 इतकी रक्कम तुम्हाला मिळेल.

हे देखील वाचा Shoaib Malik Sana Javed: शोएब मलिकच्या लग्नानंतर सानियाकडून धक्का देणारी प्रतिक्रिया समोर..

Shoaib Malik: अबब! सानियाला सोडण्यासाठी शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी रक्कम..

Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

Chanakya Niti On Respect: या पाच कारणामुळे माणसाला कधीच मिळत नाही सन्मान..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.