Shoaib Malik Sana Javed: शोएब मलिकच्या लग्नानंतर सानियाकडून धक्का देणारी प्रतिक्रिया समोर..
Shoaib Malik Sana Javed: सानिया मिर्झा (sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) या दोघांच्या लग्नाला वादग्रस्तापासून सुरुवात झाली. केवळ सुरुवातच नाही, तर आता या लग्नाचा अंतही वादग्रस्तच झाला आहे. शोएब मलिकने काल लग्न केल्यानंतर, आज सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध फारसे चांगले नाहीत. या दोन्ही देशांचे शत्रुत्व कायम असल्याचे नेहमी बोलले जाते. दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांना कट्टर शत्रू समजतात. मात्र प्रेमाला सीमा नसते, हे शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांनी दाखवून देत 2010 ला विवाह केला. सानिया मिर्झा पाकिस्तानी क्रिकेटरसोबत विवाह करत असल्याने, भारतीय नागरिकांनी देखील कळाडून विरोध केला होता. सानिया मिर्झाला मोठ्या टीकेला देखील सामोरं जावं लागलं होतं.
मात्र सगळ्यांच्या टीकेची होळी करून अखेर सानिया मिर्झाने २०१० ला शोएब मलिकसोबत विवाह केला. तेरा वर्ष दोघांनी एकत्र संसार केल्यानंतर, आता दोघेही अधिकृतरित्या वेगळे झाले आहेत. केवळ वेगळेच नाही, तर काल अनेकांना धक्का देत शोएब मलिकने विवाह देखील केला आहे. गेल्या दीड वर्षापासून दोघांचा घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक माध्यमांनी या संदर्भात वृत्त देखील दिले होते. मात्र दोघांकडून काहीही प्रतिक्रिया आली नव्हती.
काल अचानक शोएब मलिकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पाकिस्तान एक्टरेस सना जावेद (sana Javed) सोबत लग्न केल्याचे फोटो पोस्ट केले. लग्नानंतर आज सानिया मिर्झा कडून प्रतिक्रिया समोर आली आहे. सानिया मिर्झाच्या बहिणीने सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे, सानिया आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमी गुपित ठेवणं पसंत करते. मात्र कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरू नये, म्हणून हे कळवणे आवश्यक आहे. सानियाने स्वतः शोएब मलिक पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी आमच्या दोघांचा घटस्फोट देखील झाला आहे. शोएब मलिकला त्याच्या नवीन इनिंगसाठी आम्ही शुभेच्छा देतो. अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपूर्वी या दोघांचा घटस्फोट झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याने, या दोघांनी हे का लपवले? अशाही चर्चा आता रंगल्या लागल्या.
हे देखील वाचा Shoaib Malik: अबब! सानियाला सोडण्यासाठी शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी रक्कम..
Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..
Chanakya Niti On Respect: या पाच कारणामुळे माणसाला कधीच मिळत नाही सन्मान..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम