Virat Kohli T20 future: ..म्हणून विराट आहे BCCI च्या निशाण्यावर; विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय t20 करिअर संपुष्टात?

0

Virat Kohli T20 future: दक्षिण आफ्रिकेमध्ये निवड समिती (Indian cricket selection committee) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये आगामी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या t20 सिरीजसाठी संघ निवडीवर चर्चा झाली. टी ट्वेंटी सिरीजसाठी भारतीय संघ काय असेल, याविषयी चर्चा झाली असली तरी दोन दिवस उलटूनही संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सिरीजसाठी (ind vs AFG T20 series) आज भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. जय शहासह (jay shah) बीसीसीआयचे (BCCI) प्रमुख अधिकारी आणि निवड समिती यांच्यामध्ये मीटिंग सुरू आहे. भारतीय संघाचा आगामी टी-20 रोड मॅप काय असेल, याविषयी चर्चा केली जात असून, रोहित आणि विराट यांच्यावर फैसला घेण्यात येणार आहे. (Virat Kohli Rohit Sharma T20 future)

मीडिया रिपोर्ट नुसार रोहित शर्मा अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये कर्णधार असेल. मात्र विराट कोहलीला या सिरीजसाठी संधी देण्यात येणार नसल्याची माहिती आहे. अनेक मीडिया हाऊसेसने या संदर्भात रिपोर्ट देखील सादर केले आहेत. निवड समिती विराट कोहलीला भारताच्या t20 संघात सहभागी करून घेण्याविषयी सकारात्मक आहे. मात्र जय शहा यांचा या निर्णयाला विरोध असल्याची माहिती आहे.

अनेक बड्या टूर्नामेंटमध्ये विराट कोहलीचा परफॉर्मन्स आकडे लक्षात घेतले, तर भारताच्या एकाही T20 खेळाडूचे आकडे विराट इतके मजबूत नाहीत. मात्र तरी देखील आता विराट कोहली शिवाय भारतीय टी ट्वेंटी संघ बांधणी सुरू असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराट कोहलीला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे. याचं कारणही माध्यमांकडून प्रसारित करण्यात येत आहे.

2021 T20 वर्ल्ड कप नंतर मी टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे विराट कोहलीने जाहीर केले होते. यापुढे मी एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व करेल, असेही विराट कोहली म्हणाला होता. मात्र तत्कालीन बीसीसी अध्यक्ष सौरभ गांगुलीने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आम्ही दोन वेगवेगळे कर्णधार पाहू इच्छित नसल्याचे कारण करत देत, विराट कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हकलपट्टी केली.

विराट कोहलीने मात्र व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आम्ही दोन वेगवेगळे कर्णधार पाहू इच्छित नाही, असं मला अजिबात सांगण्यात आलं नाही. या उलट मी टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला हा एक चांगला कॉल आहे, असं सांगण्यात आलं. कोहलीच्या या विधानानंतर सौरभ गांगुली आणि BCCI खोटे बोलत असल्याचं उघड झालं. क्रिकेटच्या चाहत्यांनी गांगुली आणि बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं.

तेव्हापासून विराट कोहली बीसीसीआयच्या निशाणावर असल्याचे नेहमी बोलले जाते. विराट कोहलीने बीसीसीआय सोबत घेतलेला पांगा आता त्याच्या अंगलट आला आहे. आगामी टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराट कोहली भारतीय संघात खेळताना दिसणार नाही. हे आता जवळपास स्पष्ट झाले असून, या संदर्भात अधिकृत घोषणा बीसीसीआय आज रात्रीपर्यंत करू शकते.

आकडे आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत विराट कोहलीला भारतीय टी-ट्वेंटी संघातून बाहेर करता येऊ शकत नाही. मात्र तरी देखील बीसीसी हा कॉल घेत असल्याने, आता क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा AFG vs IND T20I Squad: भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! BCCI रोहितवर मेहरबान, विराट कोहली मात्र T20 मधून आउट..

Airplane Mode: आता मोबाईल flight mode वर टाकूनही करता येणार इंटरनेटचा वापर; जाणून घ्या प्रोसेस..

IND vs AFG T20I Squad : केएल राहुलचे T20 करिअर संपुष्टात..

YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

UPI New rules: आता एका दिवसात करता येणार पाच लाखाचे व्यवहार आणि बरच काही; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.