Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..

0

Men women relationship: नातं हे जीवनाची सुंदर कल्पना आहे. जीवन आनंददायी बनवायचं असेल, तर नाती सुंदर आणि मजबूत असायला हवीत. हे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलंही असेल. मात्र नातं कधीही आपल्या पार्टनरचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट माहिती असल्याशिवाय फार काळ टिकू शकत नाही. नात्यातील स्ट्रॉंग आणि विक पॉईंट एकमेकांना माहिती असणं फार आवश्यक आहे. तरच त्या नात्यांमध्ये प्रामाणिकता टिकून राहते.

अनेकजण आपल्यामध्ये असणारा वीक पॉइंट लपवून ठेवतात. मात्र नात्यातली ही सगळ्यात मोठी चूक असते. कधीही स्वतःचा, खासकरून जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत नवीन आयुष्याची सुरुवात करता, तेव्हा चुकूनही पार्टनर पासून तुमच्यात असणारे वीक पॉईंट लपवू नका. जाणून घेऊ पुरुष आणि स्त्रियांमध्ये असणारे वीक पॉईंट.

एखाद्या महिलेने जर तुमच्या समोर दुसऱ्या पुरुषांना अधिक महत्त्व दिले, तर पुरुषांचा इगो मोठ्या प्रमाणात हर्ट होतो. त्यामुळे महिलांनी पार्टनर तुमच्या सोबत असेल, आणि त्याच दरम्यान तुमच्या जवळच्या मित्राची भेट झाली, तर त्याच्याशी बोलताना मर्यादा पाळणे आवश्यक आहे.

स्त्रियांच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो. दोन महिलांपैकी जर तुम्ही एखाद्या महिलेची अधिक स्तुती केली, तर तिला प्रचंड त्रास होतो. याची किंमत तुम्हाला भोगावी देखील लागते. आपला पार्टनर सोबत असेल तर इतर महिलांची स्तुती चुकूनही करू नका.

स्त्रिया कमकुवत असतात, असा अनेकांचा समज आहे. मात्र हे खरं नाही. स्त्रिया भावुक असतात. त्यामुळे अनेकांना त्या कमकुवत वाटतात. मात्र भावुक होणे हे कमकुवत नाही, तर कणखरपणाचे लक्षण आहे.

आनंद, दुःख या दोन्ही गोष्टी स्त्रिया आणि निराशाने साजरा करतात. दोन्ही बाबतीत स्त्रिया आपल्या भावनांना वाट मोकळ्या करून देतात. दुःख असेल ते रडून, भांडून विषय संपवून टाकतात. पुरुष मात्र याला अपवाद आहेत. पुरुष अनेकदा आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत नाही. परिणामी भावनांचा मोठा साठा तयार झाल्यानंतर, पुरुष एकटेपणात रडतात. हा पुरुषांचा हा वीक पॉईंट आपापल्या पार्टनर्सला माहिती असणं आवश्यक आहे. तरच नातं अधिक काळ टिकलं जाऊ शकतं.

महिलांनी एखाद्या पुरुषाला जर तिच्या मनातून काढून टाकलं, तर त्या त्यांचा कधी विचारही करत नाहीत. अगदी महिला पुरुषांचा चेहरा देखील लक्षात ठेवत नाहीत. पुरुषांच्या बाबतीत मात्र हे अगदी उलट आहे. एखाद्या महिलेला विसरणं पुरुषांसाठी खूप मोठं आव्हान असतं. अनेक वर्ष एखादी महिला पुरुषांपासून दूर गेली, तरीही तो तिच्या आठवणीत अनेकदा रमताना पाहायला मिळतो.

महिलांकडून पुरुषांचा जर विश्वासघात झाला, तर पुरुषांकडून नेहमी या घटनेचा गाजावाजा केला जातो. पुरुष अनेकदा महिलांना दोषही देत राहतात. इतरांजवळ देखील तिच्याविषयी बोललं जातं. नात्यात जर महिलांचा विश्वासघात झाला, तर महिला मात्र हा विश्वासघात शांतपणे पासून पुढे जाते. विश्वासघाताविषयी ती कधीच ब्लेम करत नाही.

हे देखील वाचा NHM Pune Recruitment: आरोग्य विभागात या उमेदवारांसाठी मेगा भरती; वाचा सर्व डिटेल्स..

T20 World Cup 2024: या दोन खेळाडूंशिवाय भारत T-20 World Cup जिंकूच शकत नाही..

mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?

Google pay New rules: 45 दिवसांसाठी Google pay आणि phone pay देणार आता उसने पैसे; जाणून घ्या रक्कम आणि प्रोसेस..

Amruta Fadnavis video: मुली सोबत शुभेच्छा देणं अमृता फडणवीसांना पडलं महागात; नेमकं त्या व्हिडिओत आहे तरी काय.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.