Mahela Jayawardene On Rohit Sharma: हार्दिक पांड्याच्या निवडीवर कोच जयवर्धनेने सोडलं मौन; अजब तर्क आणि कारण देत म्हणाला..

0

Mahela Jayawardene On Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (Indian premier league) सुरू व्हायला आणखी खूप कालावधी बाकी आहे. त्यापूर्वीच आयपीएल (ipl) स्पर्धा प्रचंड चर्चेत आली आहे. मुंबई इंडियन्सला तब्बल पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला अचानक कर्णधार पदावरून काढून त्याच्या जागी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड हे चर्चेत येण्याचे प्रमुख कारण आहे. याशिवाय आयपीएलच्या इतिहासामध्ये लिलाव टेबलवर सर्वाधिक जास्त बोली मिचेल स्टार्कला लागली. (Mitchell starc) हेही एक कारण आहे. अशातच मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians global head) हेड माहेला जयवर्धनेने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधार पदाविषयी खुलासा केल्याने खळबळ माजली आहे.

गुजरात टायटन्स संघाची कॅप्टनशी सोडून हार्दिक पांड्या मुंबईमध्ये परतला, तेव्हाच अनेकांना धक्का बसला होता. त्याहून मोठा धक्का रोहित शर्माला अधिकृतरित्या कर्णधार पदावरून काढून, हार्दिक पांड्याची निवड केली गेली, या बातमीने बसला. रोहित शर्माच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने गेल्या दोन सीझनमध्ये सुमार कामगिरी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतला आहे, लपून राहिले नाही. मात्र यावर माहेला जयवर्धने अजब तर्क लावून उत्तर दिले आहे.

जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत माहेला जयवर्धने म्हणाला, रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते.  रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची निवड हा क्षण आमच्यासाठी प्रचंड भावुक होता. रोहित नवीन पिढीचा मार्गदर्शक आहे. तो मैदानात आणि मैदानाबाहेरही हे काम करत राहील.

भविष्याच्या दृष्टीने विचार करून हार्दिक पांड्याची निवड केली आहे. संघाचे हित लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कठीण असला तरी घेणे गरजेचे होतं, असंही तो म्हणाला. रोहित शर्माच्या कर्णधार पदावर जयवर्धनेने केलेले भाष्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याचे हे उत्तर अनेकांना आवडले नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणखी दोन, तीन सिझन खेळू शकला असता.

भविष्याच्या दृष्टीने संघाचे हित पाहून निर्णय घ्यायचा होता, तर हार्दिक पांड्याची निवड का? असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू होते. जो खेळाडू कर्णधार पदासाठी आपल्या संघाला सोडून गेला, पुन्हा त्यालाच कर्णधार करण्याचा निर्णय म्हणजे, इतर खेळाडूंवर होणारा हा अन्याय नाही का? असाही सवाल उपस्थित केला असून, जयवर्धनने हा लावलेला अजब तर्क आहे. रोहित शर्माच्या कर्णधार पदावर जयवर्धनेने दिलेलं उत्तर रोहित शर्माचा सन्मान ठेवणारं नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा Aakash Ambani on Rohit Sharma: चाहता म्हणाला, रोहितला परत आणा; चाहता आणि रोहितलाही अपमानित करत आकाश अंबानी म्हणातो..

Acharya Chanakya thought: या सात जणांना झोपेतून चुकूनही उठवू नका; सहावा आहे, फारच भानायक..

malaika arora Viral video: तो फोटो काढायला आला, अन् थेट मलायकाच्या कंबरेतच हात घातला; पाहा खतरनाक व्हिडिओ..

Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..

Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.