Aakash Ambani on Rohit Sharma: चाहता म्हणाला, रोहितला परत आणा; चाहता आणि रोहितलाही अपमानित करत आकाश अंबानी म्हणातो..

0

Aakash Ambani on Rohit Sharma: आयपीएल 2024 स्पर्धा( IPL 2024) कधी होईल, याविषयी अजूनही स्पष्टता करण्यात आली नाही. मात्र त्यापूर्वीच आयपीएल स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याला कारणही तसंच आहे. अचानक मुंबई इंडियन्सच्या (mumbai Indians) कर्णधारपदी हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. कर्णधार पदाच्या कारकीर्दीत रोहित शर्माने (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघाला तब्बल पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली. मात्र तरीही रोहित शर्माला कर्णधार पदावर काढून टाकून, हार्दिक पांड्याची निवड केली.

रोहित शर्माची कॅप्टन पदावरून हकालपट्टी केल्यानंतर, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली.केवळ चाहतेच नाही, तर संघातील अनेक खेळाडूंनी देखील उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यानंतर, एकाही खेळाडूने त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. याउलट हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं.

एकीकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हटवून रोहित शर्माचा अपमान केला, हे उघड असलं तरी दुसरीकडे भविष्याच्या दृष्टीने हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली, हा विषय क्रिकेट चाहता म्हणून समजूही शकतो. मात्र आता कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतरही रोहित शर्माचा अपमान करणं सुरूच असल्याचं पाहिला मिळत आहे.

रोहित शर्माच्या एका छोट्या चाहत्याने आकाश अंबानीला (Aakash Ambani) सवाल उपस्थित केला. छोट्या चाहतेच्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश अंबानीने मात्र चिमुकल्याचा आणि रोहित शर्मा दोघांचाही अपमान केल्याचे पाहायला मिळालं. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माचा चाहता म्हणाला, रोहित शर्माला परत घेऊन या. यावर आकाश अंबानीने संतापजनक उत्तर दिलं. जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

रोहित शर्माच्या चाहत्याने सवाल उपस्थित केल्यानंतर, त्या प्रश्नाला उत्तर देताना आकाश अंबानी म्हणाला, चिंता करू नकोस, रोहित शर्मा फलंदाजीसाठी येणार आहे. आकाश अंबानीचे हे उत्तर रोहित शर्माचा अपमान करणारे असल्याचं चाहते म्हणत आहेत. सोशल मीडियावर आकाश अंबानीला यासंदर्भात ट्रोल देखील करण्यात येत आहे. रोहित शर्मा फलंदाजीसाठी येणार आहे. हे आम्हाला माहीतच आहे. आमची मागणी कर्णधार पदाची आहे. अशा कमेंट चाहत्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

हे देखील वाचा malaika arora Viral video: तो फोटो काढायला आला, अन् थेट मलायकाच्या कंबरेतच हात घातला; पाहा खतरनाक व्हिडिओ..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.