IND vs SA 1st ODI: संजू खेळणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर केएल राहुल स्पष्टच बोलला..

0

IND vs SA 1st ODI: सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-ट्वेंटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसरा t20 सामना दक्षिण आफ्रिकेने तर तिसरा टी ट्वेंटी सामना भारताने जिंकत, ही मालिका बरोबरीत सोडली. टी ट्वेंटी मालिके नंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज जॉनसबर्ग मैदानावर खेळवला जाईल.

रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुलच्या (kl Rahul) नेतृत्वात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सातत्याने डावलण्यात आलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson) देखील या मालिकेसाठी निवडण्यात आलं आहे.

रिंकू सिंग, साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, संजू सॅमसन, तिलक वर्मा या खेळाडूंपैकी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना केएल राहुलने पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या प्लेयिंग इलेव्हन विषयी काही प्रमाणात स्पष्टीकरण दिले आहे.

संजू सॅमसनला भारताच्या प्लेइंग 11मध्ये संधी मिळणार का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना केएल राहुलने स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, संजूने मधल्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर त्याला खेळविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

जोहान्सबर्ग खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असणार आहे. त्यामुळे सामना हाईस्कोरिंग होण्याची अपेक्षा आहे. फिनिशिअर म्हणून रिंकू सिंगला भारताच्या अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1:30 वाजल्या पासून सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हा सामना जर मोबाईलवर पाहायचा असेल, तर डिस्ने+ हॉटस्टार या ओटीटी ॲपवर पाहता येईल.

 हे देखील वाचा IPL auction 2024: दिल्ली कॅपिटल्सने रोहीत शर्माला दिली कॅप्टन पदाची ऑफर; पत्नी रितिकाची कमेंटही चर्चेत..

Mumbai Indians: बुमराह नंतर सूर्यकुमार यादवचाही मुंबई इंडियन्सला दणका; पाहा नेमकं काय घडलं..

Shame On MI : हार्दिक पांद्याच्या षडयंत्रात अडकली मुंबई इंडियन्स, अन् बळी गेला रोहीत शर्माचा..

Hardik Pandya MI captain: मुंबई इंडियन्स नंतर हार्दिक पांड्या भारताच्या T20 संघाचाही कर्णधार; रोहीतच्या वाढल्या या तीन अडचणी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.