IND vs NZ World Cup 2023 Semi final: रॉस टेलरने रोहित शर्माला भरवली धडकी; ..म्हणाला न्युझीलंड प्रचंड धोकादायक कारण..
IND vs NZ World Cup 2023 Semi final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या विश्वचषक 2023 (world Cup 2023) मधील पहिला सेमी फायनल सामना खेळण्यात येणार आहे. उद्या दोन वाजता वानखेडेच्या मैदानावर हा सामना सुरू होईल. उद्या सामना असला तरी गेल्या दोन दिवसापासून भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात जोरदार रंगली आहे. अशातच आता रॉस टेलरच्या (Ross Taylor) एका विधानामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.
भारतीय संघ या विश्वचषकात नऊ सामन्यात नऊ एकतर्फी विजय संपादन करून अव्वल क्रमांकावर आहे. मात्र सेमी फायनल सामन्यात पराभव झाला, तर अव्वल क्रमांकाचा काहीही फायदा होणार नाही. पराभवा बरोबरच भारतीय संघाचे विश्वचषकामधील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यात न्युझीलंड संघ नॉक आउट सामन्यांत भारतासाठी नेहमी वरचड ठरला आहे. त्यामुळे सेमी फायनल सामना भारतासाठी सोप्पा नसणार आहे.
2019 मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असला तरी आता न्युझीलंड संघाचा माजी फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) एक विधान केलं आहे. ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टेलर म्हणाला, भारत या विश्वचषकात दमदार खेळला आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने तो फेवरेट देखील आहे.
भारत आणि न्यूझीलंडची या विश्वचषकामधील कामगिरीची तुलना करायची झाल्यास, भारत अधिक सरस खेळ खेळला आहे. न्युझीलंड संघाने चढउतार पाहिले आहेत. मात्र सेमी फायनल सामन्याचे गणित वेगळे असेल. न्युझीलंड संघासाठी गमवण्याकरिता काहीही नाही. अशा स्थितीत जेव्हा आमचा संघ असतो तेव्हा तो अधिक धोकादायक ठरतो.
रॉस टेलरने केलेल्या विधानामुळे भारतीय क्रिकेट चाहते आता चिंतेत आहेत. रॉस टेलरचे विधान भारतीय टीम मॅनेजमेंट पर्यंत देखील पोहोचले असेल. जेव्हा एखादा मोठा खेळाडू असा प्रकारचे विधान करतो, खास रॉस टेलर सारखा खेळाडू जो प्रकाशझोतात येण्यासाठी काहीही बडबड करत नाही. तेव्हा त्याच्या विधानाचा खेळाडूंवर मानसिकदृष्ट्या नक्कीच परिणाम होतो.
हे देखील वाचा IND vs NZ 1st Semi final: वानखेडेच्या ज्या खेळपट्टीवर सामना होणार ती भारतासाठी आहे धोकादायक; जाणून घ्या पीच आणि टॉसचे गणित..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम