England tour West Indies: सुमार कामगिरीनंतर इंग्लंडच्या सहा दिग्गजांना डच्चू; आगामी मालिकेच्या संग निवडीची जोरदार चर्चा..

0

England tour West Indies: 2019 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाला 2023 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्येही प्रवेश करता आला नाही. इंग्लंड संघाने या विश्वचषकात फारच निराशाजनक आणि सुमार कामगिरी केली. वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या नावाला साजेशी खेळी करता आली नाही. बेन स्टोकने अखेरच्या दोन सामन्यात दमदार खेळ केला. मात्र तो इंग्लंड संघाला सेमी फायनलचे तिकीट मिळवून देऊ शकला नाही.

इंग्लंडने विश्वचषकात केलेल्या सुमार कामगिरीनंतर आता आगामी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात तब्बल पाच दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनेकांना डच्चू दिला असला तरी कॅप्टन म्हणून मात्र जोस बटलरलाच संधी दिली आहे.

विश्वचषक 2023 मध्ये आता केवळ दोन सेमी फायनल आणि एक अंतिम सामना शिल्लक राहिला आहे. न्युझीलंड संघ नॉक आउट सामन्यात भारतासाठी नेहमी धोकादायक ठरला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला न्युझीलंड बरोबरच या वर्ल्ड कप मधील पहिला सेमी फायनल सामना खेळायचा आहे. बुधवारी 15 तारखेला पहिला सेमी फायनल सामना वानखेडे मैदानावर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याकडे अनेकांचं लक्ष लागलं असतानाच इंग्लंड संघाच्या संघ निगडीचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या खेळाडूंपैकी केवळ पाच खेळाडूच वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी आणि तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत खेळणार आहेत. इंग्लंडचा संघ अद्याप मायदेशी परतला नाहीतोवरच इंग्लंड बोर्डाकडून ही मोठी कारवाई केल्याने आता मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वेस्टइंडीज दौऱ्याला तीन डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडचा संघ या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच t20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेच्या कर्णधार पदाची जबाबदारी बटलरकडेच देण्यात आली आहे. मात्र बटलर व्यतिरिक्त अनेक बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

तीन एकदिवसीय आणि पाच T20 मालिकेसाठी बटलर कर्णधार असेल. बटलर शिवाय या मालिकेसाठी सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, हे चार खेळाडू असतील. डच्चू दिलेल्या यादीमध्ये डेविड विली , जॉनी बेयरेस्टो, मार्क वुड, जो रूट, डेविड मलान, यांचा समावेश आहे. तर बेन स्टोक्सला विश्रांती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा Avoid These Food In Dinner: सावधान..! रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका हे आठ शाकाहारी पदार्थ..

Eastern Railway recruitment 2023: या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत 1832 जागांची नवी भरती..

World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमी-फायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

IND vs NZ: भारत-न्युझीलंड सेमी फायनलवर पाऊसाचे सावट; सामना रद्द झाला तर काय? जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.