IND vs NZ: भारत-न्युझीलंड सेमी फायनलवर पाऊसाचे सावट; सामना रद्द झाला तर काय? जाणून घ्या सविस्तर..

0

IND vs NZ: क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता वर्ल्ड कप २०२३ च्या सेमी फायनल (world Cup 2023 semi final) सामन्यांकडे लागलं आहे. भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand 1St Semi final) आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) या चार संघात विश्वचषक 2019 चे दोन सेमी फायनल सामने पार पडणार आहेत. पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर 15 नोव्हेंबरला खेळवला जाईल. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने, क्रिकेट चाहत्यांमध्ये सामन्या विषयी संभ्रमता आहे. 15 नोव्हेंबरला भारत न्युझीलंड सामन्या दिवशी देखील पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्वण्यात आला आहे. सामन्या दरम्यान पावसाचा व्यत्यय आला. आणि सामना रद्द झाला, तर आयसीसीने या संदर्भात नियम जारी केला आहे.

यजमान भारत विश्वचषक 2023 मध्ये दमदार फॉर्ममध्ये आहे‌ अद्याप एकाकी संघाकडून भारत पराभूत झाला नाही. आठ विजयसहभारत अव्वल क्रमांकावर आहे. उद्या नेदरलँड संघाविरुद्ध भारताचा अखेरचा सामना होणार आहे. असं असलं तरी सेमी फायनलमध्ये मात्र भारतीय संघाला न्यूझीलंडचे तगडं आव्हान आहे.

2019 मध्ये झालेल्या विश्वचषक सेमी फायनल सामन्यात न्युझीलंड संघाने भारतीय संघाला पराभवाची धूळ चालली होती. या पराभवाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाकडे चालून आली आहे. दुर्दैवाने सेमी फायनल सामना रद्द झाला, तरी देखील भारतीय संघाला त्याचा फायदा होणार आहे.

आयसीसीने सेमी फायनल सामन्यासाठी रिझर्व डे ठेवला आहे. सामन्या दिवशी जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर दुसऱ्या दिवशी हा सामना खेळवला जाईल. मात्र दुसऱ्या दिवशी देखील सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर मात्र या स्पर्धेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या संघाला थेट फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे न्युझीलंड संघाला मोठं नुकसान होणार असून, सेमी फायनल सामना न खेळताच त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

हे देखील वाचा  World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमी-फायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

ODI WC 2023 : चार वर्षात दोन World Cup जिंकणाऱ्या इंग्लंडची इतकी वाताहात का झाली?

Flipkart big Diwali sale 2023: Samsung चे 4 महागडे smartphone Flipkart वर मिळतायत फक्त 13 हजारांत..

Ajit Pawar meet Amit Shah: शरद पवारांचा होकार मिळताच अमित शहांना भेटले अजित पवार? जाणून घ्या भेटीचे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.