Flipkart big Diwali sale 2023: Samsung चे 4 महागडे smartphone Flipkart वर मिळतायत फक्त 13 हजारांत..

0

Flipkart big Diwali sale 2023: कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दिवाळीमध्ये बंपर डिस्काउंटवर मिळतात. दिवाळीला खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला गर्दीत शॉपिंग करायला आवडत नाही. मात्र आता शॉपिंग करण्यासाठी प्रत्यक्ष बाजारात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण फ्लिपकार्ट ई कॉमर्स वेबसाईटवर दमदार डिस्काउंटमध्ये ग्राहकाला हवी ती वस्तू खरेदी करता येते.

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर फ्लिपकार्टवर सॅमसंग मोबाईल कंपनीचे दमदार स्मार्टफोन केवळ 13 हजार रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart या e-commerce website ने सध्या दिवाळी निम्मित बिग दिवाळी सेल आयोजित केला आहे.

या सेलमध्ये Samsung चे काही निवडक स्मार्टफोन discount मध्ये मिळत आहेत. यात Galaxy F14 5G, सॅमसंग गॅलेक्सी F13, सॅमसंग गॅलेक्सी M14 5G, A14 या स्मार्टफोनचा समावेश आहे.

Samsung Galaxy M14 5G

-SAMSUNG Galaxy M14 5G हा स्मार्टफोनची मूळ किंमत 18,990 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये हा फोन तुम्हाला केवळ 13114 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. सॅमसंग फोनवर फ्लिपकार्ट ने 30 टक्के डिस्काउंट ठेवला आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही EMI च्या पर्यायामध्ये देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. हा smartphone 6000 mAh बॅटरीसह आणि 12GB रॅमसह येतो.

Samsung Galaxy F14 5G

18 हजार 490 ही सॅमसग F14 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत आहे. मात्र फ्लिपकार्टवर दिवाळी सेल अंतर्गत हा स्मार्टफोन केवळ 12 हजार 490 रुपयांत खरेदी करता येत आहे. म्हणजेच तब्बल 32 टक्के discount सह या फोनची विक्री केली जात आहे. हा फोन 6 GB रॅम तर 128 GB स्टोरेजसह मिळतो. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार आहे. 50MP बॅक, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F13

सॅमसंग F13 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर केवळ 10 हजार 199 रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही कमी बजेट मध्ये एक दमदार कॅमेरा फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा फोन चांगला पर्याय आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP + 5MP + 2MP असा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A14

१८४९९ रुपये मूळ किंमत असणारा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर दिवाळी सेल अंतर्गत फक्त पंधरा हजार रुपयात खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनला डिस्प्ले, कॅमेरा, आणि बॅटरी बॅकअप दमदार देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सीमध्ये A सिरीज ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar meet Amit Shah: शरद पवारांचा होकार मिळताच अमित शहांना भेटले अजित पवार? जाणून घ्या भेटीचे कारण..

IND vs NZ Semi final: अ‍ॅडम गिलख्रिस्टने ठेवलं वर्मावर बोट; न्यूझीलंडला दिला भारताला पराभूत करण्याचा कानमंत्र..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.