IND vs NZ Semi final: अ‍ॅडम गिलख्रिस्टने ठेवलं वर्मावर बोट; न्यूझीलंडला दिला भारताला पराभूत करण्याचा कानमंत्र…

0

IND vs NZ Semi final: विश्वचषक 2023 स्पर्धा (world Cup 2023) अंतिम टप्प्यात आली आहे. भारत ( India) दक्षिण आफ्रिका (South Africa) ऑस्ट्रेलिया (Australia) न्यूझीलंड (New Zealand) हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. न्युझीलंड संघ सेमी फायनलमध्ये अधिकृतरित्या पोहोचला नाही. मात्र गुणतालिका पाहता,भारतासोबत न्युझीलंडच पहिला सेमी फायनल सामना वानखेडे मैदानावर खेळेल.

न्यूझीलंडचा संघ नॉक आउट सामन्यात धोकादायक आहे. अशातच भारतीय संघाला पराभूत करण्याचा कानमंत्र ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) न्युझीलंड संघाला दिला आहे. भारतीय संघ या विश्वचषकात आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. प्रत्येक संघाला भारतीय संघाने पराभूत केले आहे. न्यूझीलंड संघाने सलग चार सामने जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाचा विजय रथ भारतानेच रोखला.

न्युझीलंड संघाला भारतीय संघाने पराभूत केल्यानंतर, 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनाचा बदला घेतल्याचे बोलले गेले. मात्र विश्वचषक 2023 मध्ये पुन्हा एकदा न्युझीलंड भारतासोबत खेळणार आहे. परंतु यावेळी आव्हान सेमी फायनलचे असणार आहे. न्युझीलंडने भारताला नॉक आउट सामन्यात अनेकदा पराभूत केले आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या सेमी फायनल कडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे.

एकीकडे भारतीय संघ तिन्ही प्रकारात दमदार खेळाचे प्रदर्शन करत आहे. असं असलं तरी भारताला अनेकदा फायनल आणि सेमी फायनलमध्ये पराभव पाहावा लागला आहे. विशेष म्हणजे, न्युझीलंडने देखील भारतीय संघाला नॉक आउटमध्ये तीनदा परभवची धूळ चारली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने न्युझीलंडला कानमंत्र दिला आहे.

एका माध्यमाला बोलताना तो म्हणाला, मला वाटतं भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना कमकुवत वाटतो. फलंदाजी पेक्षा भारतीय गोलंदाजी दमदार फॉर्ममध्ये आहे. संध्याकाळपेक्षा दुपारी भारतीय गोलंदाजाचा सामना करणे आणि धावा काढणं अधिक सोपं आहे. मोठी धावसंख्या उभारल्यानंतर धावांचा पाठलाग करणे भारतीय संघाला अवघड जाईल.

World Cup 2023 मध्ये भारतीय संघाने पाच सामने धावांचा पाठलाग करून जिंकले असले तरी अ‍ॅडम गिलख्रिस्टने केलेल्या विधानामध्ये तथ्य आहे. वानखेडे मैदानावर सुरुवातीची काही षटके जलदगती गोलंदाजांना मदत मिळते. चांगली धावसंख्या उभारली आणि भारतीय संघाच्या सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद करण्यात न्युझीलंड संघाला यश आले, तर भारतीय संघ पराभूत होण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचा World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमीvफायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

WC Semi final: अजूनही रंगू शकतो भारत-पाकिस्तान सेमी फायनलचा थरार; पण त्यासाठी पाकिस्तानला करावं लागेल हे कठीण काम..

India Post Recruitment 2023: या उमेदवारांसाठी टपाल विभागात नोकरीची मोठी संधी; जाऊन घ्या अर्ज प्रक्रिया..

Sara Ali Khan: सारा अली खानच्या पार्टीत पोहचला कार्तिक आर्यन; घरी गेल्याने रंगल्या patch up च्या चर्चा, साराने केले स्पष्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.