Ajit Pawar meet Amit Shah: शरद पवारांचा होकार मिळताच अमित शहांना भेटले अजित पवार? जाणून घ्या भेटीचे कारण..
Ajit Pawar meet Amit Shah: 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटफेर पहायला मिळाले. विचारधारेला वेशीवर टांगून अनेक राजकीय पक्षांनी तडजोडी केल्या. खास करून भाजपने (bjp) अनैतिकतेचा कळसच गाठला. शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन 2019 मध्ये सत्ता स्थापन केली. मात्र त्यापूर्वी भाजपने अजित पवारांना (ajit Pawar) सोबत घेऊन पहाटे शपथविधी केला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नेतृत्वातलं सरकार पाडून भाजपने एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं. केवळ उद्धव ठाकरे यांचे सरकारच नाही, तर शिवसेना पक्ष देखील फोडण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडले. आणि आपणच शिवसेना असल्याचे ज्ञान पाजळले.
शिवसेना नंतर अगदी जशीच्या तशी स्क्रिप्ट राष्ट्रवादीने गिरवली. अजित पवार यांच्या नेतृत्वात 40 हून अधिक आमदार राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडले. आणि आम्हीच राष्ट्रवादी असल्याचं म्हटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची या संदर्भातले सुनावणी प्रकरण आता सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांकदे सुरू आहे.
एकूणच नैतिकतेला काळीमा फासत महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. एकीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला असला तरी दुसरीकडे ते शरद पवार यांनाही भेटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची संभ्रमता देखील आहे.
काल पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार (sharad pawar) यांना भेटले. शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी प्रफुल पटेल यांच्यासोबत दिल्लीत जाऊन अमित शहांची देखील भेट घेतली. यापूर्वी देखील अजित पवार शरद पवार आणि अमित शहा यांना भेटले आहेत. मात्र यावेळच्या भेटीची जोरदार चर्चा झाली आहे. त्याचे कारण म्हणजे, अजित पवार यांना डेंग्यू झाल्याच त्यांच्या कर्यालाकडू सांगण्यात आले होते. मात्र अचानक शरद पवार आणि अमित शहा यांना भेटल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलट फेर होणार असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय नेते भेटीचे कारण कधीही सांगत नसले तरी, अजित पवार यांच्या भेटीचा अर्थ राजकीय जाणकारांकडून लावला जातोय. विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबर पर्यंत एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि सोळा आमदाराच्या अपात्रते संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी महाराष्ट्र राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार हे लपून राहिले नाही.
सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी पूर्वी अजित पवार यांना महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाणार असल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार शरद पवार यांना भेटले असल्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री होत असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. अजित पवार शरद पवारांना हेच सांगण्यासाठी गेले असावे. असंही अर्थ काढला जातोय.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवार अमित शहाना भेटले. शरद पवार जर आमच्या सोबत येत असतील, तरच आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू. असंही अमित शहांनी अजित पवार यांना सांगितलं असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यामुळे शहांना भेटण्यापूर्वी अजित पवार शरद पवार यांचे मन वळवण्यासाठीच गेले असावे, असाही अंदाज बांधला जातोय.
हे देखील वाचा World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमी-फायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम