Eastern Railway recruitment 2023: या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत 1832 जागांची नवी भरती..

0

Eastern Railway recruitment 2023: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला पूर्व रेल्वे विभागामध्ये मोठी संधी आहे. पूर्व रेल्वे विभागाने या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1832 रिक्त जागांसाठी प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे.

पूर्व रेल्वे विभागाकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, पदसंख्या या विषयी जाणून घेऊया सविस्तर. 

पदे/ शैक्षणिक पात्रता

पूर्व रेल्वेगांकडून करण्यात येणाऱ्या भरतीसाठी १८३२ जागा आहेत. या सर्व रिक्त जागा प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरल्या जाणार आहेत. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी त्याचबरोबर आयटीआय 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक तपशील पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करून जाहिरात पहा.

अर्ज शुल्क/ अर्ज पद्धत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करून या परीक्षेसाठी पात्र होता येणार आहे. यासाठी शंभर रुपये अर्ज शुक्ल आकारला जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://er.indianrailways.gov.in/ असं सर्च करा. खाली संबंधित पर्यायावर क्लिक करून तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया

अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या निवडीविषयी सांगायचं झाल्यास, उमेदवारांची निवड चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर होईल. चाचणी परीक्षा गुणांच्या आधारावर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखत झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. निवडीची सगळी प्रक्रिया उमेदवारांना वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.

अधिकृत वेबसाईट https://er.indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://actappt.rrcecr.in/

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.