Avoid These Food In Dinner: सावधान..! रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका हे आठ शाकाहारी पदार्थ..

0

Avoid These Food In Dinner: प्रत्येकाला निरोगी आरोग्य हवं असत. त्यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात. अगदी डाइट (diet) व्यायाम (exercise) पुरेसा आराम अशा सगळ्या चांगल्या सवयींचे काटेकोर पालनही करतात. मात्र तरीदेखील आरोग्याच्या समस्या उद्भवल्याचे पाहायला मिळतं. खास करून पोटाच्या समस्या. या सगळ्या समस्येला रात्रीचे जेवण जबाबदार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Avoid These 8 vegetables Food In Dinner)

रात्रीचा जेवण हे नेहमी हलक्या स्वरूपात करायला हवं. असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाऊ नयेत, याविषयी तुमच्यापैकी अनेकांनी निश्चितच ऐकलं नसेल. चिकन, मटन इत्यादी पदार्थ रात्री खाऊ नयेत. याविषयी तुम्हाला माहिती असेल. मात्र काही शाकाहारी पदार्थांचा देखील यामध्ये समावेश आहे. काही शाकाहारी पदार्थ रात्रीच्या जेवणात खाल्ल्याने देखील पोटाचे अनेक विकार जडतात.

ब्रोकोली

व्यायाम करणारी मंडळी ब्रोकोली या पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. ब्रोकोली ही प्रचंड फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. ब्रोकोलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने, रात्री पचायला जड जाते. ब्रोकोलीमध्ये असणारे फायबर पचायला जास्त वेळ लागत असल्याने, रात्रीची झोपमोड होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात ब्रोकोलीचे सेवन फायदेशीर ठरत नाही.

टोमॅटो आणि वांगी

अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल. मात्र टोमॅटो आणि वांगी हे देखील रात्रीच्या जेवणातून हद्दपार करायला हवीत. जवळपास 70 टक्के लोकांच्या घरात टोमॅटो आणि वांग्याची भाजी आठवड्यातून एक दोन वेळा हमकास केली जाते. खास करून खेडेगावामध्ये याचे प्रमाण मोठे आहे.

टोमॅटो आणि वांग्यामध्ये अमिनो अँसिड टायरामाईन मुबलक प्रमाणात असते. अमिनो अँसिड टायरामाईनमुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो. आणि त्यामुळे रात्रीच्या जेवणात या पदार्थाचे सेवन केल्याने, झोप मोडीची शक्यता असते. पुरेशी झोप न झाल्याने ऍसिडिटीची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात या पदार्थाचे सेवन टाळावे.

काकडी आणि फ्लॉवर

रात्रीच्या जेवणात फ्लॉवर आणि काकडी देखील खाऊ नये. काकडीमध्ये जवळपास 95 टक्के पाण्याचा समावेश असतो. रात्रीच्या जेवणात जर तुम्ही काकडीचे सेवन केले, तर तुमच्या झोपेवर परिणाम होतो. फ्लॉवरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबर पचण्यासाठी अधिक वेळ देखील लागत असल्याने, फ्लॉवर व्यवस्थित पचला जात नाही. त्यामुळे रात्री फ्लॉवर पासून दूर राहणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

दही गोड पदार्थ

रात्रीच्या जेवणात दही आणि गोड पदार्थाचा समावेश असेल, तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्ययांचा सामना करावा लागू शकतो. रात्री गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची अधिक शक्यता असते. ज्याचा झोपेवरही परिणाम होतो. त्यामुळे साखर आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन रात्रीच्या जेवणामध्ये करणं घातक ठरू शकते. दही आपल्या शरीरासाठी प्रचंड फायदेशीर असले तरी रात्री खाल्ल्यास कप होण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमीvफायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.