IND vs NZ 1st Semi final: वानखेडेच्या ज्या खेळपट्टीवर सामना होणार ती भारतासाठी आहे धोकादायक; जाणून घ्या पीच आणि टॉसचे गणित..

0

IND vs NZ 1st Semi final: विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा जिंकण्यासाठी आता केवळ दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. नऊ सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत नऊही सामने एकतर्फी जिंकले आहेत. मात्र आता भारतीय संघासमोर आव्हान असेल ते सेमी फायनल सामन्याचे. भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये असला तरी सेमी फायनल सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना मानसिक दृष्ट्या तयार व्हावे लागणार आहे. (IND vs NZ 1st Semi final)

गेल्या काही वर्षांत नॉक आउट सामन्यांमध्ये दमदार रेकॉर्ड राहिलेल्या न्युझीलंड संघासोबत भारतीय संघाला सेमी फायनल सामना खेळायचा आहे. एकीकडे न्यूझीलंड संघाचा नॉक आउट सामन्यांमध्ये दमदार रेकॉर्ड आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाचा रेकॉर्ड धडकी भरवणारा आहे. अनेकदा न्युझीलंड संघाने नॉक आउट सामन्यात भारतीय संघाला धूळ चारली आहे. अगदी आयसीसी टूर्नामेंटच्या फायनल आणि सेमी फायनल सामन्यामध्येही पराभव केला आहे.

2019 मध्ये न्युझीलंड कडून सेमी फायनल सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडियाकडे असणार आहे. न्युझीलंडचा पराभव करून पुन्हा एकदा भारतीय संघाला विश्वविजेता होण्याची संधी आहे. भारतीय संघ फॉर्ममध्ये देखील आहे. मात्र समोर न्यूझीलंड संघाचे तगडे आव्हान असल्याने, खेळाडूंबरोबर क्रिकेट चाहत्यांच्या मनात भीतीही आहे.

उद्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये पहिला सेमी फायनल (semi final) सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना वानखेडेच्या मैदानावर असल्याने, टॉस खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा अधिक फायदा असला तरी न्युझीलंड संघाला देखील या खेळपट्टीचा फायदा होणार आहे.

मोठ्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणे हा सगळ्यात सेफ आणि चांगला पर्याय समजला जातो. मात्र वानखेडेच्या मैदानावर दव पडत असल्याने धावांचा पाठलाग हा पर्याय देखील फारसा चुकीचा नाही. मात्र संध्याकाळी अंडर लाईट सुरुवातीचे काही षटके या मैदानावर चेंडू स्विंग होतो. ज्याचा फायदा न्युझीलंडचे गोलंदाज उचलू शकतात. 2019 च्या विश्वचषकाप्रमाणे उद्याच्या सामन्यातही भारतीय प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले तर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगु शकते.

भारतीय गोलंदाज दमदार फॉर्ममध्ये असल्याने, धावा डिफेन्ड करणे भारतीय संघासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. मात्र न्युझीलंड संघाच्या सलामीवीरांनी संध्याकाळी सुरुवातीची काही षटके सावधपणे खेळून काढली. तर मात्र धावांचा पाठलाग करणं अधिक सोयीस्कर देखील होणार आहे. प्रथम फलंदाजी करून भारतीय फलंदाजांनी जर साडेतीनशे धावांच्या आसपास न्युझीलंड संघाला टार्गेट दिले, तर भारतीय संघाला जिंकण्याची अधिक संधी आहे.

हे देखील वाचा England tour West Indies: सुमार कामगिरीनंतर इंग्लंडच्या सहा दिग्गजांना डच्चू; आगामी मालिकेच्या संग निवडीची जोरदार चर्चा..

World Cup semi final: ..का आहे न्युझीलंड भारतासाठी खतरा; जाणून घ्या सेमी-फायनलचे गणित आणि जिंकण्याची शक्यता..

Eastern Railway recruitment 2023: या’ उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत 1832 जागांची नवी भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.