UT69 : राज कुंद्रा शिल्पा शेट्टी खरंच वेगळे झालेत? झाला मोठा खुलासा..

0

UT69 : नाईंटीनच्या दशकातील बॉलीवूडची (Bollywood) सुपरस्टार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) हे दोघेही सध्या एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. या बातम्या प्रसारित होण्याचे कारण म्हणजे, राज कुंद्रा याने स्वतः आपण वेगळं होत असल्याची घोषणा केली होती.

पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. अनेक महिने राज कुंद्राला जेलमध्ये देखील राहावं लागलं. जेल मधून बाहेर आल्यानंतर, तो नेहमी तोंडावर वेगवेगळ्या प्रकारचे मास्क घालून फिरत असायचा. या सगळ्या प्रकरणावर त्याची एक नवी फिल्म देखील येत आहे. UT69 असं या चित्रपटाचं नाव आहे.

राज कुंद्रा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शिल्पा शेट्टीने देखील पुढाकार घेतला आहे. काही दिवसापूर्वी राजने आपल्या सो मीडिया अकाउंटवरून आम्ही आता वेगळे होत असल्याचे, ट्विट केलं होतं. राजने केलेल्या या ट्विटमुळे शिल्पा शेट्टी सोबत तो घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता या संदर्भात अधिक माहिती समोर आली आहे.

राज कुंद्रा याने UT69 या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून, आम्ही वेगळे होत असल्याचं ट्विट करून अनेकांचे लक्ष वेधल्याचं आता समोर आलं आहे. एका ओळीच्या ट्विट नंतर त्याने आता आणखी एक ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला, दोन वर्ष सोबत दिल्याबद्दल धन्यवाद. आता वेगळे होण्याची वेळ आली आहे. अशाप्रकारे तोंडावरच्या मास्क संदर्भात त्याचं ते ट्विट होत.

आपल्याला आठवत असेल, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा नेहमी तोंडावर मास्क घालूनच मीडिया समोर येत असायचा. पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्राचा UT69 हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून, त्याने ते ट्विट केल्याचे आता समोर आलं आहे.

हे देखील वाचा IND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

Shikhar Dhawan video: शिखर धवनला आला पत्नीचा फोन; रडत माफी मागत म्हणाली..,”; धवनने व्हिडीओही केला शेअर..

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.