Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

0

Sexual relationship : पती-पत्नीच्या (husband wife) नात्यांमध्ये लैंगिक संबंधाला (physical relationship) प्रचंड महत्त्व आहे. पती-पत्नीचे नाते प्रेम, विश्वास, सन्मान, या गोष्टीवर जसं टिकून असतं. त्याचप्रमाणे लैंगिक संबंधावर देखील टिकून असतं. आनंदी आणि समाधानकारक लैंगिक संबंधामुळे नात्यात ओलावा, प्रेम टिकून राहतं. खरंतर आपल्याकडे या विषयावर आजही उघडपणे बोलले जात नाही. मात्र दोघांनाही लैंगिक सुख आणि समाधान मिळणं फार आवश्यक आहे.

लैंगिक संबंध ठेवण्याची कोणतीही ठराविक वेळ नसली तरी एका संशोधनानुसार रात्री संबंध करणे योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. काढण्यात आलेल्या निष्कर्षाची काही कारणे देखील देण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैंगिक इच्छेच्या वेगवेगळ्या वेळा आहेत.

एका संशोधनानुसार, महिलांना रात्री झोपण्यापूर्वी संबंध ठेवायला अधिक आवडतं. अनेकजण जास्ती करून झोपण्यापूर्वी संबंध ठेवतात. मात्र संबंध ठेवण्याची ही योग्य वेळ नाही. कामामुळे दिवसभर पुरुष थकून जातो. साहजिकच त्यामुळे संध्याकाळी शरीराला केवळ झोप आवश्यक असते. शरीर केवळ झोपेची वाट पाहत असते. त्यामुळे संबंध ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा प्राप्त होत नाही.

लैंगिक संबंधांमध्ये जर दोघांनाही संतुष्टता आणि आनंद हवा असेल, तर संबंध ठेवण्याची योग्य वेळ पहाटे असल्याचे संशोधनानुसार समोर आले आहे. रात्री पुरेशी झोप मिळाल्याने दिवसभराचा सर्व थकवा दूर होतो. शुक्राणूची संख्या ही अधिक वाढते. त्यामुळे संबंध ठेवण्यासाठी पुरेशी ताकद, ऊर्जा मिळते. त्यामुळे महिलांनाही अधिक सुख आणि समाधान मिळत असल्याचं समोर आलं आहे.

संबंध ठेवण्याची सर्वाधिक योग्य वेळ पहाटे असली तरी संबंध ठेवण्यासाठी ठराविक वेळच असायला हवी, असं काही नाही. असेही संशोधनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. अनेकांना कामाच्या व्यापामुळे संबंध ठेवण्याच्या वेगवेगळ्या वेळा असू शकतात. प्रत्येकाच्या दिनक्रमानुसार संबंध ठेवायला हरकत नाही. मात्र इतर महत्त्वाच्या कामाप्रमाणेच हे काम देखील तितकेच आवश्यक असल्याचे विषयाचे अभ्यासक लिसा थॉमस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचाIND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीचा तिरस्कार करत शोएब अख्तर पुन्हा बरळला; म्हणाला..

Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..

PAK vs AFG: पाकिस्तानच्या पराभवामुळे सेमी फायनलचे गणित झाले स्पष्ट; भारत, न्युझीलंड आफ्रिका नंतर हा संघ पोहचणार..

Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.