PAK vs AFG: पाकिस्तानच्या पराभवामुळे सेमी फायनलचे गणित झाले स्पष्ट; भारत, न्युझीलंड आफ्रिका नंतर हा संघ पोहचणार..

0

PAK vs AFG: विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने निकाल दुसरा मोठा उलटफेकर करून दाखवला. बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंड नंतर अफगाणिस्ताने पाकिस्तान संघाला चारी मुंड्या चित करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केला आहे. या पराभवाबरोबरच पाकिस्तान संघाचे आता सेमी फायनल मधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. सोबतच सेमी फायनलचे गणितही स्पष्ट झाले आहे. (World Cup 2023 semi final scenario)

काल चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान संघाला धूळ चारली. (Afghanistan beat Pakistan by 8 wickets) टॉस जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी केली. इप्तिकार अहमद आणि शादाब खान यांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत पाकिस्तान संघाला 283 धावांचे आव्हानही उभे करून दिले. मात्र हे आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

पाकिस्तान संघाच्या पराभवा बरोबरच आता त्यांचे सेमी फायनलचे आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आले नसले, तरी प्रचंड आव्हानात्मक आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तानच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचे आवाहन अधिक सोईस्कर झाले आहे. पाकिस्तान संघाला जर सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल, तर उर्वरित चार सामन्यात चारही विजय आवश्यक आहेत.

विश्वचषक 2023 च्या सेमी फायनलमध्ये अद्याप एकही संघ अधिकृतरित्या पोहचला नाही. मात्र भारतीय संघाने पाचही सामन्यात पाच विजयासह अव्वल स्थान पटकावले आहे. चार सामन्यात भारतीय संघाला केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. दुसरीकडे न्युझीलंडच्या संघालाही चार सामन्यात दोन विजयाची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेला देखील पाच सामन्यात तीन विजयाची आवश्यकता आहे.

या सगळ्या शक्यतांचा विचार केला, तर या तिन्ही संघाला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची सर्वात जास्त संधी आहे. या तीन संघा नंतर सेमी फायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ ऑस्ट्रेलिया ठरू शकतो. त्याचे कारण म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाला पाच सामन्यात चार विजयाची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इंग्लंड आणि पाकिस्तान संघाला देखील सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. मात्र त्यांना उर्वरित सगळे सामने जिंकावे लागणार आहेत.

पाकिस्तान इंग्लंड या दोन संघाचा आतापर्यंतचा खेळ पाहिला, तर हे दोन्ही संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकतील, याची शक्यता फार कमी वाटते. महत्त्वाचं म्हणजे इंग्लंड संघाला बलाढ्य भारताचाही सामना करायचा आहे. तर पाकिस्तान संघालाही न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन हात करावे लागतील.

हे देखील वाचा Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..

IND vs NZ: ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ..

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.