IND vs NZ: ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ..

0

IND vs NZ:भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये काल खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय संपादन केला. कालच्या विजयात भारतीय संघाकडून विराट कोहली (Virat kohli) आणि मोहम्मद शमीने मोलाचा वाटा उचलला. मात्र आता या विजयाबरोबरच एक नवा वाद निर्माण झाला आहे.

दमदार सुरुवातीनंतर, भारतीय संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. एकवेळ भारताची स्थिती पाच बाद 191 अशी झाली होती. रन आउटच्या रूपात भारतीय संघाला पाचवा धक्का बसला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव दोघांच्याही अंडरस्टँडिंगच्या कमतरतेमुळे भारताने रन आउटच्या रूपात विकेट गमावली. मात्र या विकेटचं सगळं खापर आता विराट कोहलीवर फोडण्यात आले असून, गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे या विश्वचषकात सूर्यकुमार यादवला खेळण्याची संधी मिळाली. या कारकिर्दीतला विश्वचषकामधला पहिलाच सामना सूर्यकुमार यादव खेळला. सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाला सामना जिंकून देण्याची संधी होती. मात्र तो धावबाद झाला. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर चाहत्यांनी विराट कोहलीनेच त्याला जाणून बुजून धावबाद केले असल्याचा आरोप केला.

विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला (suryakumar Yadav) जाणून बुजून आउट करण्याचे कारणही चाहत्यांकडून सोशल मीडियावर ट्रेण्ड केले गेले. सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर असता, तर त्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत भारतीय संघाला लवकर सामना जिंकून दिला असता. साहजिक त्यामुळे विराट कोहलीला शतक करण्याची संधी मिळाली नसती. आणि त्यामुळेच विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला मुद्दाममून run out केल्याचा आरोप केला जात आहे.

एकीकडे चाहतांकडून हा आरोप केला जात असला तरी दुसरीकडे वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. दोघेही एकमेकांकडे पाहत नव्हते. दोघेही चेंडूकडे पाहत असल्याने दोघांमध्ये ताळमेळ बसला नाही. विराट कोहली रन घेण्यासाठी धावल्याचं सूर्यकुमारने पाहिले आणि तो चेंडूकडे पाहत जोरदार धावत सुटला. त्यातून सूर्यकुमार यादवला धावबाद व्हावे लागले.

हे देखील वाचा ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ…

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..

WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..

Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.