IND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

0

IND vs ENG: विश्वचषक 2023 मधील भारतीय संघाचा पुढील सामना 29 नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्ध खेळण्यात येणार आहे. हा सामना लखनऊच्या मैदानावर होणार असल्याने खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना साथ देणारी असेल. इंग्लंडच्या दृष्टीने हा सामना प्रचंड महत्त्वाचा असला तरी, भारतीय संघाला टी 20 विश्वचषक 2022 मधील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. अशातच आता हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापती विषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

 

बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याचा पाय मुरगळून दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो न्युझीलंड विरुद्धचा सामनाही खेळू शकला नव्हता. त्यामुळे भारतीय संघात दोन बदल करावे लागले होते. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सूर्यकुमार यादवला (SuryaKumar Yadav) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. न्युझीलँड सामन्यानंतर भारतीय संघाला एका आठवड्याचा कालावधी मिळाला असल्याने, हार्दिक पांड्याच्या रिकव्हरीसाठी पुरेशा वेळ मिळाला आहे.

हार्दिक पांड्याला पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज असेल. मात्र भारतीय टीम मॅनेजमेंट कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी दहा दिवस पूर्ण होत असले तरी तो अधिक धिका नको म्हणून, हार्दिक पांड्या इंग्लंड विरुद्धचा सामना देखील खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या खेळणार नसल्याने भारतीय संघ शमीसह मैदानात उतरणार आहे. याबरोबरच सूर्यकुमार यादवला देखील भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे एक अतिरिक्त गोलंदाज आणि अतिरिक्त फलंदाज कमी पडत आहे. त्याची भरपाई म्हणून स्पेशालिस्ट जलदगती गोलंदाज आणि एक स्पेशालिस्ट फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी लागत आहे.

हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भाग नसल्याने, ऑल राऊंडर रवींद्र जडेजासह सहा स्पेशालिस्ट फलंदाज आणि पाचच स्पेशालिस्ट गोलंदाज घेऊन रोहित शर्माला (rohit sharma) मैदानात उतरावे लागत आहे. न्युझीलंड विरुद्ध हार्दिक पांड्याची कमी जाणवली नाही. मात्र इंग्लंड संघाची फलंदाजी मजबूत असल्याने, एका अतिरिक्त गोलंदाजाची आवश्यकता असेल. रोहित शर्मा पुढे कोणताही पर्याय नसल्याने सेम कॉम्बिनेशनसह मैदानात उतरावं लागेल.

हे देखील वाचा Shoaib Akhtar on Virat Kohli : कोहलीचा तिरस्कार करत शोएब अख्तर पुन्हा बरळला; म्हणाला..

IND vs NZ: ..म्हणून विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला केले जाणून बुजून रन आउट; गंभीर आरोपामुळे खळबळ..

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.