Solapur News: पराभवामुळे विरोधकांचा संयम सुटला; सहकारी सोसायटीच्या विजयी उमेदवाराला धमकी..
दबावाला बळी पडून एका संचालकाचा राजीनामा? संकटाचा सामना लोकशाही मार्गाने करू; सुनील कर्चे
Solapur News: माळशिरस: खेळ आणि राजकारणामध्ये जय-पराजय या नाण्याच्या दोन बाजू असतात. जो खेळाडू किंवा संघ उत्तम डावपेच आखून मैदानात उतरतो, बहुतेकदा तोच विजय साकारतो. फाजील आत्मविश्वास, अपुरी तयारी करून मैदानात उतरणाऱ्या खेळाडू किंवा संघांना पराभवाचा सामना करावा लागतो. हे ‘नव्याने’ सांगण्याची गरज नाही. परंतु पराभव झाला तरीदेखील विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून, परिपक्व राजकारणी म्हणून आपले चारित्र्य दाखवून देण्याची ही मोठी संधी असते. मात्र अलीकडे राजकारणात सहसा हे पाहायला मिळत नाही. असाच एक प्रकार माळशिरस (malshiras) तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी (Pimpri) गावामध्ये देखील घडला आहे. ग्रामपंचायतीचा अजब कारभार! पाणी असूनही पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही; वयोवृद्ध महिलांचा पाण्यासाठी टाहो..
पिंपरी गावातील राजकारणात तरुणांच्या सक्रिय सहभागामुळे प्रस्थापितांच्या राजकारणाला हळूहळू सुरुंग लागायला आता सुरुवात झाली आहे. निडवणुक लढण्याची पात्रता काय असते, हे लक्षात न घेता केवळ जिंकण्याचं गणित डोक्यात ठेवून निवडणूक लढणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना दोन वर्षापूर्वी अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. ..म्हणून या छोट्याश्या गावात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीची होतेय सर्वत्र चर्चा..
अपात्र ठरलेल्या सदस्याच्या जागेवर लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये प्रस्थापितांना केवळ सहा महिन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. लोकशाही मार्गाने संघर्षाचा मार्ग स्वीकारला, तर परिवर्तन निश्चित होते, याची जाणीव तरुणांना पिंपरी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ४ च्या पोटनिवडणुकीत झाली. लोकशाही मार्गाने संघर्षाचा मार्ग स्वीकारल्यावर, प्रस्थापितांचा देखील पराभव करता येऊ शकतो, याची जाणीव झाल्यानंतर तरुणांनी पुढचे पाऊल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरीच्या निवडणुकीत टाकले.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरीच्या निवडणुकीत तरुणांनी सक्रिय सहभाग घेतला. निवडणूक लढवली आणि “परिवर्तन विकास पॅनल”चा विजय देखील खेचून आणला. “विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी”च्या चेअरमन पदी “छगन वसंत कर्चे” यांची निवड झाली. मात्र एका वर्षांनंतर त्यांनी वयक्तिक कारणामुळे आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेसाठी साहजिकच चेअरमन पदाची निवडणूक जाहीर झाली, आणि पुन्हा एकदा प्रस्थापितांना धक्का बसला.
“विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी”च्या चेअरमन पदाच्या निवणुकीसाठी नानासाहेब राणे आणि शिवाजी कर्चे यांनी अर्ज भरला. चेअरमन पदाच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना, शिवाजी कर्चे यांनी आपला फॉर्म माघारी घेतला. साहजिकच त्यामुळे नानासाहेब राणे यांचीच “विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी”च्या चेअरमन पदी बिनविरोध निवड होईल, असं वाटत होतं.
मात्र नानासाहेब राणे यांचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरीच्या चेअरमन पदी बिनविरोध निडचीचं स्वप्न भंगले. ऐनवेळी संचालक “सुनील दादा कर्चे” यांनी चेअरमन पदासाठी आपलाही अर्ज दाखल केला. आणि “विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी”च्या चेअरमन पदी बिनविरोध विराजमान होण्याचे नानासाहेब राणे यांचं स्वप्न भंगले. केवळ बिनविरोध चेअरमन होण्याचं स्वप्नच भंगले नाही, तर 5-8 अशा दारून पराभवाला देखील नानासाहेब राणे यांना सामना करावा लागला.
नवनिर्वाचित चेअरमन सुनील कर्चे यांनी संचालकांचे आभार मानत, केली खंत व्यक्त..
नानासाहेब राणे यांचा 5-8 असा पराभव करून सुनील कर्चे यांनी ऐनवेळी बाजी मारत अनेकांना धक्का दिला. मात्र पराभूत उमेदवार आणि त्यांचा गट हा पराभव पचवू शकला नाही. नवनिर्वाचित चेअरमन सुनील कर्चे यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना म्हंटले, हा विजय माझा नसून, सर्व संचालकांचा विजय आहे.
तुमच्याकडे प्रामाणिकपणा, व्हिजन, नम्रपणा आणि प्रत्येकाला सन्मानाने वागणूक देण्याचा गुण असेल, तर लोकं तुम्हाला स्वीकारतात. या विजयाचे विश्लेषण करायचं झाले तर मी याच शब्दात करेन. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित चेअरमन सुनील कर्चे यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, एकीकडे विजयाचा आनंद होत असला तरी दुसरीकडे दुःख देखील होत आहे. राजकारणात कधी विजय, कधी पराजय हा होत असतो. मात्र पराभूत उमेदवाराच्या गटाने मला शुभेच्छा देण्याऐवजी धमकी दिली, हे अनपेक्षित आहे. तू आमच्या विरोधात निवडणूक लढवून चूक केली आहेस, तुला हे खूप जड जाईल, अशा प्रकारे विरोधक धमकी देत आहेत. पण आम्ही त्याकडे फारसं गांभीर्याने पाहत नाही. पराभवामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. येणाऱ्या संकटाचा संयमाने आणि लोकशाही मार्गाने सामना करू आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत राहू.
दबावाला बळी पडून संचालक सोपान पाटील यांनी राजीनामा दिला?
“विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरी”च्या चेअरमन पदाच्या निकालानंतर वॉर्ड क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या सोपान पाटलांनी आपल्या संचालक पदाचा अचानक राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला? याविषयी ठोस माहिती मिळाली नाही. मात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पिंपरीचे “व्हॉईस चेअरमन” भानुदास धोंडीबा कर्चे महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना म्हणाले,
संबंधित संचालक सोपान पाटील हे वॉर्ड क्रमांक 3 च्या सभासदांचे प्रतिनिधित्व करत होते. वॉर्ड क्रमांक तीनच्या सभासदांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेला आहे. संचालक सोपान पाटील यांनी हा निर्णय हा घेतला? याविषयी माहिती घेतली जाईल. विरोधकांच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची, माहिती मला मिळाली आहे. जर खरंच असं झालं असेल, तर आम्ही प्रशासनाकडे निश्चित कायदेशीर पद्धतीने न्याय मागणार आहोत.
पिडीत न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी मी माझ्या दोन्ही मुलांना वकिलीचे शिक्षण दिले. एवढंच नाही, तर आपण ज्या गावात राहतो, त्या गावासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. हा विचार करून मी माझ्या मुलांना माळशिरस तालुक्यातच वकिलीची प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला. जर आम्ही आमच्याच सहकारी सोसायटी संचालकांच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असतानाही गप्प बसून सहन करत राहिलो, तर इतरांना आम्ही अन्याया विरोधात पेटून उठा, असं सांगू शकत नाही. अशी तिखट प्रतिक्रिया व्हॉईस चेअरमन भानुदास धोंडीबा कर्चे यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली. महाराष्ट्र लोकशाही देखील या प्रकारची शोध पत्रकारिता करून वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
हे देखील वाचा IND vs WI 5th T20: हे दोन खेळाडू आजच्या निर्णायक सामन्यात चमकले, तरच मिळणार विश्वचषक संघात थेट एन्ट्री..
jayant patil: भावाला वाचवण्यासाठी जयंत पाटलांना भाजपसोबत जावेच लागेल? वाचा काय आहे प्रकरण..
ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम