jayant patil: भावाला वाचवण्यासाठी जयंत पाटलांना भाजपसोबत जावेच लागेल? वाचा काय आहे प्रकरण..

0

jayant patil: 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटफेर पाहायला मिळाले. एका वर्षापूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी शिवसेना पक्ष फोडला, हे आता लपून राहिले नाही. शिवसेना (shivsena) पक्ष चोरीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, राष्ट्रवादी पक्ष देखील फुटून भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत सहभागी झाला.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार (ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फोडून 32 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या मोठया धक्क्यातून राजकीय पक्ष आणि जनता सावरते, तोपर्यंत आणखी एक मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काल अचानक पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार (Sharad Pawar Ajit Pawar meeting) यांची एका व्यावसायिकाच्या घरी गुप्त भेट झाली. अशा बातम्या प्रसारित झाल्या.

शरद पवार आणि अजित पवार काल पुण्यात भेटलेल्या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार या दोघांच्या भेटीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) हेदेखील उपस्थित होते. जयंत पाटील अजित दादासोबत भाजपच्या सत्तेत सहभागी होणार असल्याच्या बातम्या ही प्रसारित झाल्या आहेत.

जयंत पाटील भाजप सोबत सत्तेत सहभागी होणार का? हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यातल्या जनतेला देखील पडला आहे. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आली असून, जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स, या स्वतंत्र संस्था असल्या, तरी गेल्या काही वर्षापासून या यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. अशातच आता हॉटेल व्यवसायिक आणि जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील (jaysinghrao patil) यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती मिळाली आहे.

भावाला आलेल्या नोटीसमुळे जयंत पाटील देखील आता चिंतेत असल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही, तर भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी जयंत पाटील सकारात्मक असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार भाजप विरोधात लढत आहेत, तर दुसरीकडे पक्ष फोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या सोबत देखील गुप्त चर्चा करत असल्याने, जनतेमध्ये प्रचंड संभ्रमता निर्माण झाली आहे.

जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आल्याने, आता जयंत पाटील संघर्षाचा मार्ग पत्करणार की सत्तेत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या चिखलामध्ये आपलाही पाय ठेवणार, हे पाहणं आता औत्सुक्याचेठरणार आहे.

हे देखील वाचा IND vs WI 5th T20: हे दोन खेळाडू आजच्या निर्णायक सामन्यात चमकले, तरच मिळणार विश्वचषक संघात थेट एन्ट्री..

Newly marriage Tips: नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी अशा प्रकारे खा कांदा आणि मेथी एकत्र; त्यासाठी मिळतील हे अनगिनत फायदे..

IND vs WI 5th T20: हे दोन खेळाडू आजच्या निर्णायक सामन्यात चमकले, तरच मिळणार विश्वचषक संघात थेट एन्ट्री..

ISRO Recruitment 2023: दहावी पास असाल तर लगेच या पद्धतीने करा अर्ज; ISRO मध्ये निघालीय मोठी भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.