Australia ODI World Cup squad: मार्नस लाबुशेनसह या दिग्गजांना डच्चू; असा आहे ऑस्ट्रेलियाचा ODI World Cup संघ..
Australia ODI World Cup squad: भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाची (ODI WORLD CUP 2023) तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने देखील विश्वचषकाचा संघ घोषित केला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका, भारत दौरा आणि विश्वचषकाचा संघ घोषित करताना ऑस्ट्रेलियाने काही धक्कादायक खेळाडूंना बाहेरचा रस्ता देखील दाखवला आहे. (Australia announced ODI World Cup squad 2023)
भारतामध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी इतर संघा बरोबर क्रिकेट चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ हा प्रमुख दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंना भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय आयसीसी स्पर्धेतच्या नॉकआऊट सामन्यामध्ये सगळ्यात जास्त खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलिया संघाकडे आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी एकूण 18 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख खेळाडू मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) डच्चू देण्यात आला आहे. अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आलं असून, काही नवीन चेहऱ्यांना संधी देखील देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा पार पडला. यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. यात मार्नस लाबुशेनला तीन एकदिवसीय सामन्यात केवळ 43 धावा करण्यात यश आले होते. मार्नस लाबुशेनची एक दिवसीय कारकीर्द देखील फारशी चांगली नाही. त्याने ऑस्ट्रेलियाकडून आत्तापर्यंत 30 एकदिवसीय सामने खेळलेत, ज्यात 31.17 च्या सरासरीने केवळ 847 धावा केल्या आहेत.
मार्नस लाबुशेन बरोबर टीम डेविड याला देखील ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. टीम डेविडने भारतात खेळताना दमदार कामगिरी केली आहे. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाने आपल्या वर्ल्ड कप संघात स्थान दिले नाही. जोश हेजलवुड आणि कमिन्सचे पुनरागमन झाले आहे. भारताच्या दौऱ्यात कमिन्स आणि हेजलवुड खेळले नव्हते. मात्र आता या दोघांचेही पुनरागमन झाले आहे.
असा आहे एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ…
पैट कमिंस (कॅप्टन) डेविड वार्नर, नाथन एलिस, ट्रेविस हेड, ग्लेन मैक्सवेल, एलेक्स कैरी, कैमरून ग्रीन, मार्कस स्टोइनिस, एरॉन हार्डी, जोश हेजलवुड, मिचेल मार्श, जोश इंग्लिस, तनवीर सांघा, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क , एश्टन एगर, एडम जाम्पा, शॉन एबॉट,
हे देखील वाचा WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..
Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..
Snake viral video: जिवंत उंदरला सापाने गिळले, उंदीर पोट कुरतडून बाहेर आले; पाहा हा खतरनाक व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम