WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या त्या एका चुकीमुळे भारताने जिंकलेला सामना गमावला; दिग्गजांनीही केली जोरदार टीका..
WI vs IND 2nd T20: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात भारतीय टी-ट्वेंटी संघ आगामी T20 विश्वचषकाची तयारी करत आहे. मात्र वेस्टइंडीज विरुद्ध सुरू असलेल्या T20 मालिकेत भारतीय फलंदाजांकडून ना पॉसिटीव्ह अप्रोच पाहायला मिळत आहे, ना कर्णधार हार्दिक पांड्या कडून. हार्दिक पांड्याच्या एका चुकीमुळे भारतीय संघाने जिंकलेला सामना गमावला. हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे भारताने सामना गमावला असला तरी भारतीय फलंदाज मात्र वेस्टइंडीज गोलंदाजांसमोर रडताना पाहायला मिळत आहेत. (India lost second T20 against West Indies)
दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाला वेस्टइंडीज संघाने दोन विकेट्सने धूळ चारत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला टी-ट्वेंटी मालिका जिंकायची असेल, तर आता उर्वरित तीनही टी ट्वेण्टी सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र भारतीय संघाकडून होत असलेला खेळ पाहता या मालिकेत भारतीय संघ एकही टी ट्वेंटी सामना जिंकेल असं वाटत नाही.
भारताच्या अनेक प्रमुख खेळाडूंना वगळून आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची तयारी नवीन खेळाडूंना घेऊन सुरू आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) या दिग्गज खेळाडूंना टी-ट्वेंटी क्रिकेट मधून अधिकृतरित्या डच्चू देण्यात आला नाही. परंतु 2022 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर हे दोन्ही खेळाडू एकही T20 सामना खेळले नाहीत. 2022 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर भारतीय संघाने अनेक टी-ट्वेंटी मालिका खेळल्या. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची निवड करण्यात आली नाही.
नवीन खेळाडूंना संधी देत आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकाची तयारी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सुरू केली. मात्र आव्हानात्मक खेळपट्टी आल्यानंतर, नवीन खेळाडूंनी वेस्टइंडीज गोलंदाजासमोर नांग्या टाकायला सुरुवात केली. दोन एकदिवसीय आणि दोन T20 सामन्यात नवीन फलंदाज चाचपडताना दिसले. आव्हानात्मक खेळपट्टीवर नवीन फलंदाज झगडताना दिसल्याने, सोशल मीडियावर रोहित आणि विराट कोहली ट्रेण्ड देखील व्हायला सुरुवात झाली.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुन्हा एकदा दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. पहिल्या टी-ट्वेंटी सामन्याची पुनरावृत्ती मधल्या फळीच्या फलंदाजाकडून देखील दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात पाहायला मिळाली. तिलक वर्मा (tilak Varma) व्यतिरिक्त भारताच्या एकाही फलंदाजाला वेस्टइंडीज गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारतीय संघाने वेस्टइंडीज संघासमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले.
वेस्टइंडीज संघाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. मात्र एका बाजूने निकोलस पूरनने (Nicholas Pooran) उत्कृष्ट फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. निकोलस पूरनने 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली. मात्र दुसरीकडून वेस्टइंडीजचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सामना वेस्टइंडीजच्या बाजूने असताना चहलने टाकलेल्या सोळाव्या षटकात होल्डर आणि शिमरॉन हेटमायरला बाद करत सामना भारताच्या बाजूने फिरवला.
18 चेंडूत 18 धावांची आवश्यकता असताना अठरावे षटक युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) देणे अपेक्षित होतं. मात्र हार्दिक पांड्याने अठरावे षटक अर्शदीप सिंगला दिले. एकीकडे चहल जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तर दुसरीकडे वेस्टइंडीज संघाचे तळाचे फलंदाज फलंदाजी करत होते. भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ दोन विकेटची आवश्यकता होती. चहलने यापूर्वी अनेकदा अशा सिच्युएशनमध्ये गोलंदाजी केलेली आहे. मात्र तरीदेखील हार्दिक पांड्याने चहाला गोलंदाजी न देता अर्शदीप सिंगला दिली. हार्दिक पांड्याच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली असून ही मोठी चूक असल्याचं म्हंटले आहे.
हे देखील वाचा Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..
Aacharya Chanakya quotes: सकारात्मक आणि आनंदी जीवन जगण्याचे हे आहेत तीन मूलमंत्र..
BoAt Airdopes: BoAt Airdopes 899 रुपयांत खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या कुठे सुरू आहे ऑफर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम