स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन!

0

माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 2017-18 या गळीत हंगामातील सहा कोटी रुपये थकल्या प्रकरणी माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, ‘न्यू फलटण शुगर साखरवाडी कारखान्यावर’ काल एक दिवसाचे बोंबाबोंब आंदोलन केले.

हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर,यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात माळशिरस तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तालुक्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपला बॉयलर पेटवलेला आहे. जर त्यांनी एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर,त्यांना शेतकऱ्यांच्या उसाला कोयता लावू देणार नाही. त्याचबरोबर कारखान्यांना धुराडीही पेटवू देणार नाही. वेळप्रसंगी आम्ही अधिक तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध कायम असे राहणार आहोत. आमच्या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे, असेही बोरकर म्हणाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.