Ration card update online: आता रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचे नाव नोंदवा घरबसल्या; अगदी सोप्या पद्धतीने..

0

Ration card update online: रेशन कार्डच्या (ration Card) माध्यमातून देशातील नागरिकांना सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळतो. सामान्यांच्या जगण्याचा आधार म्हणजे रेशन कार्ड आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून कोरोना काळात केंद्र सरकारने “गरीब कल्याण अन्य योजना” (PMGKAY) देखील लागू केली. या योजनेच्या माध्यमातून मानसी पाच किलो धान्य देण्यात येते.आणि म्हणून रेशन कार्ड अपडेट असणे फार आवश्यक आहे. (PMGKAY)

घरामध्ये नवीन सदस्याचं आगमन झालं असेल तर रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. मात्र आता या सगळ्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण तुम्हाला आता घरबसल्या मोबाईलच्या मदतीने तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करता येणार आहे.

यापूर्वी रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी अन्न सुरक्षा विभागात अनेक हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता या सगळ्यांपासून तुमची सुटका झाली आहे. तुम्ही आता केवळ मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या रेशन कार्डवर नवीन नाव समाविष्ट करू शकता. रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला केवळ धान्यच मिळत नाही, तर सरकारच्या अनेक योजनांचा लाभ देखील मिळतो. म्हणून रेशकार्ड हे फार महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे.

असं टाका Ration Card मध्ये नवीन नाव..

जर तुमच्या घरामध्ये नवीन सदस्यांनी प्रवेश केला असेल, उदाहरणार्थ नवीन लग्न होऊन महिला घरात आली असेल, नवीन मुल जन्माला आलं असेल, तर तुम्हाला या नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्डमध्ये घरच्या घरी अपडेट करता येईल. यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असावी लागतात. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, महिला असेल तर विवाह प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे लागतात.

रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://nfsa.gov.in/Default.aspx असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अधिकृत वेबसाइट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला होम पेजवर “रेशन कार्ड” हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे.

रेशन कार्ड” पर्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला “Ration Card Details On State Portals’‘ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं, आणि गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या रेशनचे नाव, रेशन दुकानदाराचे नाव, त्याचबरोबर रेशन कार्डचा प्रकार, हे पर्याय निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला एक लिस्ट पाहिला मिळेल. ज्यामध्ये रेशन कार्ड धारकांची नावे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ज्या सदस्याचं नाव समाविष्ट करायचं आहे, अशा सदस्यांची डॉक्युमेंट्स संबंधित पर्यायांमध्ये अपलोड करून सबमिट करायची आहेत. जर तुम्हाला ही प्रोसेस किचकट वाटत असेल, तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला (CSC) भेट देऊन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जाईल.

हे देखील वाचा  EMRS Recruitment 2023: 10+ पदवीधरांसाठी EMRS मध्ये 38 हजार 480 जागांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

Chanakya Niti Quotes: जवानीत या तीन गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..

Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..

KCR Maharashtra Daura: इकडे महाराष्ट्रात पाय ठेवले, अन् तिकडे तेलंगणात खिंडार पडले..

Darshana Pawar murder Case: ..म्हणून या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयनेच संपवलं दर्शना पवारला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.