EMRS Recruitment 2023: 10+ पदवीधरांसाठी EMRS मध्ये 38 हजार 480 जागांची मेगा भरती; लगेच करा अर्ज…

0

EMRS Recruitment 2023: दहावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत उपलब्ध झाली आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूल या ठिकाणी 38 हजार 480 हून अधिक रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रियेची सविस्तर अपडेट.

रिक्त पदांचा तपशील. 

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत 38 हजार 480 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये “प्राचार्य” या पदासाठी एकूण 740 रिक्त पदे, “उपप्राचार्य पदासाठी” 740 रिक्त पदे, “पदव्युत्तर शिक्षक” पदासाठी 8140 रिक्त पदे, “पदव्युत्तर शिक्षक कॉम्प्युटर सायन्स” या पदासाठी 740 रिक्त पदे.

“पदवीधर शिक्षक” या पदासाठी 880 रिक्त पदे, “कला शिक्षक” या पदासाठी 740 रिक्त पदे, “शारीरिक शिक्षण शिक्षक” या पदासाठी 1480 रिक्त पदे, “संगीत शिक्षण” या पदासाठी 740 रिक्त पदे, “ग्रंथपाल” या पदासाठी 740 रिक्त पदे, “वस्तीगृह वार्डन” या पदासाठी 1480 रिक्त पदे, “स्टाफ नर्स” या पदासाठी 740 रिक्त पदे, “खानपान सहाय्यक” या पदासाठी 740 “लेखपाल” या पदासाठी 740 खूप या पदासाठी 740 आणि “चौकीदार” या पदासाठी 1480 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

“कनिष्ठ सचिवालय सहाय्यक” या पदासाठी एक हजार चारशे चाळीस “मेस हेल्पर” या पदासाठी 1480 “इलेक्ट्रिशन प्लंबर” या पदासाठी 740 “समुपदेशक” या पदासाठी 740 “वरिष्ठ सचिवालय सहाय्यक” या पदासाठी 740 “सफाई कामगार” या पदासाठी 2220 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता: 

“प्राचार्य” या पदासाठी पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर बी.एड. झालेले असणे आवश्यक आहे. सोबतच 12 वर्षांचा अनुभव देखील हवा. “ग्रंथपाल” या पदासाठी लायब्ररी सायन्समधील पदवी असणे आवश्यक आहे. सोबतच लायब्ररी सायन्समधील डिप्लोमा पदवी देखील गरजेची आहे. त्यानुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. खालील जाहिरात पाहून, तुम्ही या संदर्भात सविस्तर माहिती घेऊ शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

इतका पगार मिळेल..

“आदिवासी व्यवहार मंत्रालय” अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूल याठिकाणी करण्यात येणाऱ्या, या भरतीसाठी उमेदवारांना पगार हा पदानुसार देण्यात येणार आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही पदानुसार उमेदवारांना काय पगार असेल, याविषयी सविस्तर अपडेट पाहू शकता.

ऑनलाइन अर्ज

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूल याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असणाऱ्या, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप देण्यात आली नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://emrs.tribal.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्हाला अर्ज करण्यासंबंधीचे पर्याय पाहायला मिळतील.

हे देखील वाचा KCR Maharashtra Daura: इकडे महाराष्ट्रात पाय ठेवले, अन् तिकडे तेलंगणात खिंडार पडले..

Weather Update Today: हे चार दिवस पाऊस माजवणार हाहाकार; या जिल्ह्याना धोका..

Chanakya Niti Quotes: जवानीत या तीन गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.