Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..
Chanakya Niti: प्रत्येकाला आपणही जीवनामध्ये (life) यशस्वी व्हावं, असं वाटत असतं. यासाठी अनेक जण दिवस रात्र मेहनत देखील करतात. मात्र काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, अनेकांना ध्येयप्राप्तीपासून वंचित राहावं लागतं. मात्र तुमच्या प्रयत्नामध्ये जर तुम्ही थोडासा बदल करून, आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिमत्तेचा (chanakaya niti) अवलंब केला, तर यश तुमच्या पायाभोवती लोटांगण घालेल. (Chanakya quotes)
आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य निती (Chanakya Niti) या ग्रंथामध्ये त्यांनी मानवाच्या समृद्ध जीवनासंदर्भात अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर गुरु असावा लागतो. गुरूंचे विचार आत्मसात करावेच लागतात. मात्र अलीकडे अनेकजण कोणाचाही सल्ला न घेता वाटचाल करायला सुरुवात करतात. आणि नेमके इथेच फसतात. जाणून घ्या यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेले मूलमंत्र.. (aacharya Chanakya quotes)
आचार्य चाणक्य सांगतात, मानवाने नेहमी आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यशस्वी जीवनासाठी आपल्या चुका शोधून त्यावर सुधारणा वेळेत आणणे फार आवश्यक आहे. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मात्र या काळात आपण संधी शोधण्याचे काम करायचं असतं. या संधीमध्ये तुम्ही तुमच्या कमकुवत बाजू मजबूत करणे आवश्यक असल्याचे चाणक्य सांगतात.
मानवाने यशस्वी जीवनाकडे वाटचाल करत असताना अनुकूलता बाळगली पाहिजे. प्रत्येक परिस्थिती सोबत तुम्ही जुळवून घेतले नाही, तर यश तुमच्या पासून दूर जाते. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्हाला त्याच्याशी मैत्री करणे फार आवश्यक आहे. तरच तुम्ही यशस्वी जीवनाकडे वाटचाल कराल, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.
विश्लेषण आणि धोरण
संकट कितीही मोठं असलं, तरी तुम्ही घाबरता कामा नये. संकटावर मात करण्यासाठी तुम्ही रणनीती आखणे आवश्यक आहे. तत्पूर्वी हे संकट कशामुळे आले तुम्ही या गोष्टीचा देखील धोरणात्मक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे चाणक्य सांगतात. जेणेकरून अशा स्वरूपाचे संकट पुन्हा उद्भवणार नाही.
उद्याचे काम देखील आजच करा हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. चाणक्य देखील हेच सांगतात. कोणतेही काम पुढे ढकलता कामा नये. तुमच्या आयुष्यात येणारे महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाची कामे जर तुम्ही पुढे ढकलत असाल, तर तुम्ही तुमच्या प्रगतीमधील स्वतःच मोठी अडचण आहात. जे काम करायचं आहे ते काम उद्यावर न ढकलता लगेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं चाणक्य म्हणतात.
हे देखील वाचा Chanakya Niti on Humanity: या चार लोकांची साथ वेळीच सोडा, नाहीतर आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही..
Success Story: शाब्बास..! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम